पुणे – यवत पोलीस स्टेशन हद्दीतील राहु गावच्या विजय उर्फ रामराव शहाजी सोनवणे यांच्या म्हशीच्या गोठयावरील कामगाराचा खुन झाला होता.याबाबत सुरेश बाबुराव सोनवणे यांनी फिर्याददाखल केली होती.
महादेव तुकाराम शिंगारे यांच्या विहिरीमध्ये विहिरीमध्ये एक इसम मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसला .याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी यावत पोलीस दाखल झाले असता सदर मयताचे उजवे डोळ्याचे कपाळावर, डाव्या डोळ्याचे वरती कपाळावर उजवे बाजूचे हनुवटी जवळ जखमा झाल्याचे दिसत होते.(Pune Crime News)
सदर मयत इसमाचे नाव भिमकुमार अनिल यादव (वय ३० वर्ष), बिहार, येथील मूळ रहिवासी तर विजय उर्फ रामराव शहाजी सोनवणे रा. राहु यांच्या म्हशीच्या गोठ्यावरील कामगार होता. त्याला कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने वार करून खुन करून मृतदेह महादेव तुकाराम शिंगारे यांचे मालकीचे विहिरीमध्ये टाकून दिला होता.(pune Crime News)
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक व स्थानिक पोलिसांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणचे आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तसेच आजुबाजुचे परिसरातील लोकांकडे व गोठयावर काम करणारे इतर मजुर यांचेकडे सखोल चौकशी केली. तसेच बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा खून हा सोनवणे यांच्या म्हशीचे गोठयावर काम करणारा भोला उर्फ जयाकाश जंगलाप्रसाद कुमार याने केला आहे अशी माहीती मिळाल्याने सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असुन सदर आरोपीस दिनांक २९ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे.(Muredr Case)
त्यास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दौंड कोर्ट यांचे न्यायालयात हजर केले असून मा. न्यायालयाने त्यास ०४ दिवस पोलिस कस्टडी दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पो.स. ई. मदने हे करीत आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन हेमंत शेडगे यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक के. वाय. वाबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, सचिन घाडगे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हवालदार अजित भुजबळ रामदास जगताप, पोलीस हवालदार चांदणे, पोलीस नाईक अजित काळे, अमित यादव, पोलीस कॉन्स्टेबल मारूती बाराते यांच्या पथकाने केली आहे.