Friday, July 12, 2024
Homeसाहित्य/सामाजिकराष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने ग्रंथपाल संतोष काळे यांचा विशेष सन्मान

राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने ग्रंथपाल संतोष काळे यांचा विशेष सन्मान

शिक्रापूर – दिनांक १२ ऑगस्ट शिक्रापूर ( ता.शिरूर) येथील भैरवनाथ मोफत वाचनालय ग्रामपंचायत शिक्रापूरच्या माध्यमातून वाचक ग्रंथालयाभिमुख होण्यासाठी येथील ग्रंथपाल संतोष दशरथ काळे हे सतत नवनवीन प्रयोग व संकल्पना रावीत असल्यामुळे व विनम्र सेवा न थकता देत असल्यामुळे परिसरामध्ये शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रंथालयास वाचकवर्ग विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने वाढलेला आहेे.

शिस्तप्रिय, मनमिळावू ग्रंथपाल म्हणून उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहेत अशा भावना आज ग्रंथालयाचे वाचक सभासद तुषार आळंदीकर ,प्रथमेश विश्वास व येथील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी बबलू शेख, माणिक चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते .राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने ग्रंथपाल संतोष काळे यांना गुलाबपुष्प, पेन ,पुस्तक देऊन वाचकांनी ग्रंथालयात येऊन त्यांचा विशेष सन्मान केला . यानिमित्ताने अधिकाधिक तप्तर, विनम्र व उत्कृष्ट सेवा यापुढेही देण्यात येईल असे ग्रंथपाल यांनी मनोगत व्यक्त केले.राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने वाचकांचे व ग्रामस्थांचे ग्रंथपाल संतोष काळे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!