Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा युवक वरिष्ठ उपाध्यक्षपदी उद्योजक रामदास दरेकर यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा युवक वरिष्ठ उपाध्यक्षपदी उद्योजक रामदास दरेकर यांची निवड

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील उद्योजक व स्वरा डेव्हलपर्सचे मालक रामदास दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) पुणे जिल्हा युवक वरिष्ठ उपाध्यक्षपदी खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी पुणे जिल्हा व तालुका पदाधिका-यांच्या उपस्थितीमध्ये नेमणुकीचे पत्र देण्यात आले.

या निवडीने सणसवाडी करांवर राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाने टाकलेल्या जबाबदारीमुळे व भूमिपुत्राची जिल्हा बारिशउपाध्यक्षपदी निवडीबद्दल सणसवाडी गावासह शिरूर तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या विचारांवर पूर्ण विश्वास ठेवत शिरूर हवेली तालुक्याचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा कार्यकारणीमघ्ये जिल्हा उपाध्यक्षपदी रामदास दरेकर यांची एक मताने निवड करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क असलेले, हसतमुख व मितभाषी रामदास दरेकर यांच्या निवडीने पक्षाला ग्रामीण भागात सर्वसमावेशक चेहरा व झुंजार कार्यकर्ता निवडल्यांने शिरूर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.यावेळी तरुणाई व ग्रामस्थ यांचा उत्साह मोठा होता.

सणसवाडी येथील विविध सामाजिक कार्यात रामदास दरेकर यांचा मोलाचा उत्स्फूर्त सहभाग असतो.ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या आयुष्याला विधायक व सकारात्मक प्रेरणा मिळवू यासाठी व्याख्याते वसंत हंकारे यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करून मुलांना संस्कार, आदर्श विचार व उज्वल भविष्याचे महत्त्व अधोरेखित करत पालकांचे प्रशिक्षण घेत आदर्श पालक कसे असावेत याबाबत कार्यक्रम घेतला. सणसवाडी येथील ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी रामदास दरेकर व माजी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांनी सरपंच करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत खेळीमेळीच्या वातावरणात क्रिकेट स्पर्धा यशस्वी केली. तसेच गणेश महाराज शिंदे यांचे व्याख्यान , गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा , शासन आपल्या दारी उपक्रम राबवले.

गावातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच त्यांना उज्वल भविष्य व दर्जेदार आयुष्य याबाबत मोलाचे काम केले. यावेळी जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, बालाजी गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते सणसवाडी या गावातील रामदास दरेकर यांच्या निवडीबद्दल त्यांचा गावोगावी सत्कार होत असून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. रा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणार असून पक्षाच्या विचारांना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचविण्याचे व पक्षाला नवनवीन कार्यकर्ते जोडण्याचे काम करणार आहे. – रामदास दरेकर, नवनियुक्त वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!