Friday, July 12, 2024
Homeताज्या बातम्याराव लक्ष्मी फाउंडेशन च्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू भिंगारोपण...

राव लक्ष्मी फाउंडेशन च्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू भिंगारोपण व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन

कोरेगाव भीमा – वडगाव रासाई (ता.शिरूर) येथे स्वर्गीय माजी आमदार रावसाहेब दादा पवार यांच्या १०६ व्यां जयंतीनिमित्त भव्य डोळे तपासणी, मोतीबिंदू भिंगारोपन व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार १९ मे रोजी वडगाव रासाई येथील रासाई देवी मंदिरात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान होणार आहे.

सदर शिबिर राव लक्ष्मी फाऊंडेशन व एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय महंमदवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत डोळे तपासणी शिबिर, मोफत मोतीबिंदू भिंगारोपान शस्त्रक्रिया शिबिर, मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण भागातील नागरिक,शेतकरी,कष्टकरी व मजुरांना याचा मोठा फायदा होणार आहे.

शिरूर तालुक्याचे आमदार अशोक पवार यांचे पिताश्री व शिरूर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय रावसाहेब दादा पवार यांची १०६ जयंती असून यानिमित्त राव लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून एक सामाजिक विधायक उपक्रम राबवण्यात येणार असून यामध्यामातून सर्वसामान्य जनतेची व वयोवृध्द ,आप्तेष्ट, स्नेहिजनांची भेट व आशीर्वाद मिळेल व त्यांच्याशी हितगुज साधता येईल यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी सभापती सुजाता पवार यांनी दिली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!