Friday, May 24, 2024
Homeताज्या बातम्यारावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे एकूण ७१.३६ % मतदान उत्साहात संपन्न

रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे एकूण ७१.३६ % मतदान उत्साहात संपन्न

कोरेगाव भीमा – शिरूर तालुक्यातील अत्यंत लक्षवेधी असलेल्या रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे मतदान शांततेत संपन्न झाले असून एकूण ७१.३६ % मतदान झाले आहे तर १३८२६ मतदारांनी आपला मतदान हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली.
आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल तर दादासाहेब फराटे , आबासाहेब सोनवणे व इतर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली घोडगंगा किसान क्रांती पॅनल यांनी निवडणूक लढवली असून शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीच्या लढतीत उमेदवारांचे भविष्य मतदान पेट्यांमध्ये सीलबंद झाले असून मतदानानंतर आता उत्सुकता निकालाची लागली आहे.

शिरूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी ६ नोव्हेंबर रोजी शांततेत ७१.३६ टक्के मतदान झाले. १९ हजार ३७५ मतदारांपैकी १३हजार ८२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले.
आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल व दादासाहेब फराटे, आबासाहेब सोनवणे व सहकाऱ्यांच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनेलमध्ये दुरंगी लढत झाली.


या निवडणुकीमध्ये शिरूर तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आदेशाने घोडगंगा किसान क्रांती पॅनलला पाठिंबा देणे असो की राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचार सभा यामुळे ही निवडणूक सहकारी साखर कारखान्याची जरी असली तरी पुणे जिल्ह्याच्या राजकारणासह राज्यातील राजकारणातील महत्वपूर्ण लढत मानली जात आहे.
मतदान केंद्रावर शांततेत व उत्साहाच्या वातावरणात मतदान पार पडले असले तरी निकालाकडे संपूर्ण शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्याचे व राज्यातील बड्या नेत्यांचे लक्ष असून ही निवडणूक चुरशीची व लक्षवेधी होणार असल्याचा नागरिक अंदाज लावत असून गुलाल कोणाचा ?? याबाबत कुजबुज वाढली असून नागरिकांची निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे.

रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये १३८२६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून ७१.३६ % मतदान शांततेत पार पडले – निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!