Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यारावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार अशोक पवार यांच्या शेतकरी...

रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार अशोक पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलला बहुमत

२० विरुद्ध १ करत निर्विवाद वर्चस्व मिळवत विरोधकांना धोबपछाड देण्यात आमदार पवार यशस्वी.

कोरेगाव भीमा – कानिफनाथ फाटा (ता.शिरूर) येथील कानिफनाथ मंगल कार्यालयामध्ये रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी जिल्हा उपनिबंधक निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या मार्गदर्शनखाली पार पडली यावेळी आयपीएसएम व्ही सत्यसाई ,डी वाय एस पि यशवंत गवारी ,शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, ए आर एस एस कुंभार उपस्थित होते.

सन २०२२- २३ ते २०२७ – २०२८ या पाच वर्षांकरिता व्यवस्थापकीय समिती म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांची नावे खालील प्रमाणे

 

सर्वसाधारण गट नं.१ – मांडवगण फराटा गट : १)फराटे संभाजी शिवाजी – ७१९१२) फराटे दादासो गणपत. – ६९३८सर्वसाधारण गट नं २ – इनामगाव ३) मचाले सचिन बाबासाहेब – ७७८१ ४) माने नरेंद्र अण्णासाहेब – ७४६५ सर्वसाधारण गट नं. ३ वडगांव रासाई ५) पवार अशोक रावसाहेब – ८१८७ ६) साठे उमेश सुदाम – ७४२४ सर्वसाधारण गट नं.४ – न्हावरे ७) काळे संजय ज्ञानदेव – ७८२८ ८) निंबाळकर शरद मोहनराव – ७७३३ ९) कोरेकर मानसिंग सीताराम – ७६४० सर्वसाधारण गट नं.५ तळेगाव ढमढेरे १०)गवारी सोपान वाल्मिकी – ७६८७ ११) ढमढेरे विश्वास रामकृष्ण – ७३६३ १२) भुजबळ पोपट रामदास – ७१३७ सर्वसाधारण गट नं. ६ शिरूर १३) कुरंदळे वाल्मीक धोंडीबा -७६२० १४) थोरात सुहास नारायण – ७४१९ १५) पाचुंदकर प्रभाकर उर्फ आबासाहेब नारायण – ७३७९ अनुसूचित जाती / जमाती १६) सोनवणे उत्तम रामचंद्र – ७६१४ महिला राखीव १७) कोंडे मंगल सुहास – ७६४५ १८) जगताप वैशाली सुनील – ७५५१ इतर मागास वर्ग १९) गदादे शिवाजी मुक्ताजी – ७४२६ भटक्या विमुक्त जाती / जमाती वी.मा. २०)शेंडगे बीरा बाबू – ७२०१

रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक मोठ्या चुरशीच्या व अटीतटीच्या वातावरणात पार पडली. यावेळी आमदार अशोक पवार यांच्या शेतकरी विकास पॅनल व दादासाहेब फराटे , आबासाहेब फराटे यांच्यासह सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली घोडगंगा किसान क्रांती पॅनल यांच्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. यावेळी मतदारांनी पुन्हा आमदार अशोक पवार यांच्यावर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात शेतकरी विकास पॅनल च्या उमेदवारांना मतदान देत आमदार अशोक पवार यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.पत्रकार परिषदा कारखान्याच्या कारभाराबाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्नचिन्ह असो की विरोधाततील टोकाची भाषा असो यामुळे रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चांगलीच जिल्ह्यामध्ये गाजली होती या निवडणुकीमध्ये शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवत करखण्यावरील आपले वर्चस्व कायम ठेवले असून विरोधकांना निकालातून सडेतोड उत्तर देत विरोधकांना अस्मान दाखवत निर्विवाद आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी निवडणूक निर्विवाद व यशस्वी पार पाडण्यात  मोलाचे योगदान दिले आहे .निवडणूक प्रक्रिया सहकार विभागाने यशस्वीरीत्या पार पडली असून सुरुवातीपासूनच अटीतटीची व चुरशीची असलेली निवडणूक पार पाडणे हे खरतर खूप आव्हान जिल्हा उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर व सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले आहे. पुणे जिल्ह्यात यावेळी इतर बँकाच्या निवडणुका असल्याने कर्मचारी वर्ग कमी होता तसेच सहकार विभागाची अत्यंत जोखमीची निवडणूक यशस्वी व निर्विवाद पार पाडण्यासाठी अत्यंत काटेकोर व शिस्तबद्ध नियोजन जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी पार पाडले असल्याने त्यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
हा विजय सर्वसामान्य जनतेचा ,मतदारांचा विजय आहे. आदरणीय रावसाहेब पवार यांच्याविषयी चुकीची विधाने करण्यात आली तसेच चुकीचा प्रचार करणार आला होता. राज्याचे माजी उमुख्यमंत्री अजित पवार ,माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे,सूर्यकांत पलांडे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व साखर कारखान्याचे मतदार व हितचिंतक यांचे हे यश आहे. कारखान्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून वीजनिर्मिती, इथेनॉल निर्मिती करून सभासदांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – आमदार अशोक पवार
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!