Thursday, June 20, 2024
Homeराजकारणरामदास कदम यांच्या वक्तव्यावर कराड दक्षिण शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन

रामदास कदम यांच्या वक्तव्यावर कराड दक्षिण शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन

कराड हेमंत पाटील

कराड – शिवसेना कराड दक्षिण तालुक्याच्या वतीने रामदास कदम यांनी शिवसैनिकांचे आराध्य दैवत मातोश्री व ठाकरे कुटुंबीयांवर जे बेलगाम बेताल अशोभनीयवक्तव्य केले होते त्याचा जाहीर निषेध शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने दत्त चौक छत्रपती शिवाजी स्मारक या ठिकाणी रामदास कदम यांच्या विरोधात निषेधाच्या व धिक्काराच्या जोरदार घोषणा देऊन व्यक्त करण्यात आला यावेळी रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

शिवसेना कराड तालुका शहर व जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत व धिक्कार करीत आहोत असे प्रतिपादन केले यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटिका अनिता जाधव यांनी धिक्कार करून आपल्या भावना व्यक्त केल्या

यावेळी कराड दक्षिण तालुका प्रमुख शशिकांत हापसे, मलकापूर शहर प्रमुख ,मधुकर शेलार ,युवा सेना शहर संघटक अक्षय गवळी, उपतालुका प्रमुख ,दिलीप यादव, शहाजी जाधव ,संजय चव्हाण, माणिक आथरकर ,ऋषिकेश महाडिक ,व महिला आघाडीच्या कविता यादव, शोभा लोहार, विभाग प्रमुख प्रवीण लोहार अनिल चाळके, महेश भावके, ओमकार काशीद आदी शिवसैनिक व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

रामदास कदम यांनी ३२वर्षे आमदारकी दहा वर्षे मंत्रीपद चार वर्षे विरोधी पक्षनेतेपद आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळाले असतानाही उपकाराची जाणीव न ठेवता खाल्ल्या मिठाला न जागता चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिक व जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. – शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!