मिलिंदा पवार वडूज सातारा
वडूज येथे गेले दोन दिवस वीज कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभाग घेतला होता त्यामुळे ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. शेतकरी, ग्राहकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. महावितरणाच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकार व व्यवस्थापन यांच्यात सामंजस्य करार न झाल्याने महाराष्ट्र राज्य वीज अधिकारी ,अभियंते ,कर्मचारी ,कंत्राटी कामगारांच्या सर्व संघटना आपल्या मागण्यांसाठी दोन दिवस संपावर गेल्या होत्या त्याला मान तालुका यातूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता वीज वितरणाच्या संपामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कोणताही अधिकारी कामगार उपस्थित नव्हता त्यामुळे ग्राहक व शेतकऱ्यांना उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली नव्हती. वीज नसल्याने फॅन, कुलर, बंद झाले होते. उष्णतेमुळे रात्रीची झोप लागत नव्हती. मोबाईल ,टीव्ही आदी सर्व इलेक्ट्रिक यंत्रणा बंद झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते व कधी संप मिळतो याची वाट पाहत होते .
अखेर संप मिटला ऊर्जा कंपन्यांची खासगीकरण होणार नसल्याचा शब्द राज्य सरकारने दिल्यानंतर ऐन उन्हाळ्यात उपसलेले संपाचे हत्यार वीज कर्मचारी संघटनांनी मंगळवारी अखेर मागे घेतले. राज्य सरकारची भूमिका पटल्याने संप स्थगित केल्याची घोषणा संघटनांकडून करण्यात आली. परिणामी वीज निर्मिती पासून इतर कामे पूर्ववत होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केल्याने कामगार संघटनांचे समाधान झाले. खाजगीकरण आणि अन्य मुद्यांवरून केंदीय आणि राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून संप पुकारला होता राज्य सरकारने पहिल्याच दिवशी चर्चा करण्याचे निमंत्रण देत संघटनांच्या प्रतिनिधींनी सोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला .