Friday, July 12, 2024
Homeक्राइमराज्यातील शिक्षण क्षेत्र हादरले....कोट्यावधींची बेहिशोबी माया जमावणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई

राज्यातील शिक्षण क्षेत्र हादरले….कोट्यावधींची बेहिशोबी माया जमावणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई

राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना एकाचवेळी दणका

१४५ तोळे सोन्यासह  एकूण ३ कोटी ५९ लाख ९९ हजारांची माया भ्रष्टाचारातून १९८६ ते २१ डिसेंबर २०२१ दरम्यान  अपसंपदा कमावल्याच तुकाराम सुपे यांच्यावर निष्पन्न

पुणे – पुणे लाचलुचपत प्रतिबंधक अर्थात एसीबीने ३ बड्या शिक्षण अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. एसीबीने या तीनही अधिकाऱ्यांवर गैरमार्गाने संपत्ती जमा केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल केला आहे.एकाचवेळी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील बहुधा ही पहिलीच वेळ आहे. 

राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तगडा झटका दिला आहे. बेहिशेबी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमविल्याप्रकरणी तीन शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

लाचखोरी करत शिक्षण क्षेत्राला कलंक लावलेल्या माजी शिक्षणाधिकारी असलेल्या किरण लोहार, तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. 

 टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम नामदेव सुपे ( वय ५९) तत्कालीन शिक्षणाधिकारी पुणे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे आणि त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी किरण लोहार आणि त्यांच्या कुटुंबियांवर ही कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर आता सुपे यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात, लोहार यांच्यावर सोलापूरमधील सदर बाजार पोलीस ठाणे आणि कांबळे यांच्यावर सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे.

कोणाकडे किती मालमत्ता?तुकाराम सुपे यांच्यावर ३ कोटी ५९ लाख  ९९ हजार ५९० रुपये (यामध्ये  १४५ तोळे सोने ७२लाखांचे ), किरण आनंद लोहार ( वय ५०)शिक्षणाधिकारी ,प्राथमिक शुखकन विभाग ,जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावर ५ कोटी ८५ लाख ८५ हजार  ६२३ रुपये किमतीची अपसंपदा व त्यांना यकमत पत्नी सुजाता किरण लोहार वय ४४ व निखिल किरण लोहार (वय २५) यांनी अपसंपदा संपादित करण्यात अपप्रेरणा व सहाय्य केले असल्याचेचौकशीत निष्पन्न झाले असून त्यांच्यावर सदर बाझार येथे गुन्हा मिळवण्यात आला आहे ,विष्णू मारुतीराव कांबळे (वय ५९) सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मध्यामिकम शिक्षण विभाग सांगली, यांच्यावर ८२  लाख ९९ हजार ९५२ रुपये तर   गैरमार्गाने जमावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एसीबीकडून काय कारवाई होते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिकाऱ्यांवर नेमके आरोप काय? तुकाराम सुपे हे राज्य परीक्षा आयुक्त होते. सुपे यांना गेल्यावर्षी १७ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. पण त्यानंतर काही दिवसांनी त्यांना जामीन मंजूर झाला होता. बी. एड्. आणि डी. एड्. विद्यार्थ्यांच्या शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले होते. या परीक्षेची जबाबदारी तुकाराम सुपे यांच्यावर होती. अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याची माहिती तपासातून समोर आली होती.

सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचा शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे देखील एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. या अधिकाऱ्याने काही शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी ६० हजार रुपये लाच मागितल्याची माहिती समोर आली होती.

सोलापूर जिल्हा परिषदेतील किरण लोहार यांच्याबाबतदेखील धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यांनी एका कर्मचाऱ्याकडे लाच मागितली होती. पण एसीबीने सापळा रचून त्यांना अटक केली होती. विशेष म्हणडे किरण लोहार यांनी भ्रष्टाचार करुन कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याची चर्चा रंगली होती. आता या तीनही अधिकाऱ्यांची कसून चौकशी होणार आहे.

सुपे हा गाजलेल्या टीईटी परीक्षा (TET Exam) घोटाळ्यातही आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस ठाण्यात साडेतीन कोटी रुपयांच्या अपसंपदेचा हा गुन्हा दाखल करण्यात आला. अगोदरच्या टीईटीच्या पुणे सायबर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात त्याच्याकडे भ्रष्ट मार्गाने कमावलेली पावणेतीन कोटींची रोकड, १४५ तोळे सोने असा हा साडेतीन कोटींचा ऐवज मिळून आला होता. याप्रकरणाची एसीबीचे पीआय श्रीराम शिंदे यांनी चौकशी केली, तर डीवायएसपी माधुरी भोसले या पुढील तपास करीत आहेत.

८३ लाखाची बेहिशोबी मालमत्ता भ्रष्ट मार्गाने जमा केल्याबद्दलचा दुसरा गुन्हा हा दुसरे जिल्हा शिक्षणाधिकारी कांबळे यांच्या विरुद्ध सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. त्यात त्याची पत्नी जयश्री यांना आरोपी करण्यात आले आहे.

तिसरा भ्रष्ट शिक्षणाधिकारी लोहार याच्यासह त्यांची पत्नी सुजाता, मुलगा निखील यांच्याविरुद्ध सोलापूरातील सदर बझार पोलिस ठाण्यात तब्बल पाच कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता ही भ्रष्ट मार्गाने जमा केल्याबद्दल लाचलुचप्रत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. पुणे एसीबी (Acb Unit) युनीटचे एसपी अमोल तांबे, ॲडिशनल एसपी डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही कारवाया झाल्या आहेत.

 लोकसेवक सेवेच्या कालावधीतील वैध उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचं निष्पन्न झाले आहे. म्हणून याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास लाचलुचपतच्या पोलीस अधीक्षक माधुरी भोसले या करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!