कोरेगाव भिमा – वाघोली (ता.शिरूर) गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्यावतीने राज्यस्तरीय “माझी शाळा, स्वच्छ शाळा “अभियानात घेण्यात आलेल्या परीक्षेत बी.जे.एस उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिंनी कुटे सिद्धी रमेश हिस द्वितीय क्रमांक तर कुशवाह रेणु ब्रिजेश हिला तृतीय क्रमांक मिळाल्याने विद्यालयात पारितोषक वितरण समारंभ आयोजीत करण्यात आला होता.
स्वच्छतेचे महत्व शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात रुजविण्याच्या दृष्टीने गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्यामार्फत “राज्यस्तरावर माझी शाळा स्वच्छ शाळा “अभियान राबवले गेले.या स्पर्धेमधील महाराष्ट्र राज्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला.गांधी संस्कार परीक्षा स्पर्धेमध्ये विद्यालयातील माध्यमिक गटातून ७३९ आणि उच्च माध्यमिक गटातून ७१९विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तसेच या विद्यालयातील ४२ शिक्षकांनी हि परीक्षा दिली.
तसेच दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेच्या नियमाप्रमाणे वर्ग सजावट स्पर्धा,निबंध स्पर्धा, अंतरवर्ग गुणदर्शन स्पर्धा, पोस्टर स्पर्धांचे अशा विविध स्पर्धांचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते.स्पर्धा गांधी विचारांशी, स्वच्छतेसी निगडित होते त्यामध्ये समूह गीत, पोवाडा, पथनाट्य इत्यादी विषय होते कार्यक्रमाचे निमित्ताने विद्यालयातील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना आणि वर्गांनां पारितोषिक वितरण करण्यात आले
यावेळी WERC प्रकल्प प्रमुख सुरेश साळुंखे सर,सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प बापुसाहेब कुटे,प्राचार्य संतोष भंडारी ,समन्वयक स्मिता शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचां पारीतोषक व प्रमाणपत्र देऊन देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक बाबासाहेब गव्हाणे यांनी मानले.