Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याराज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने शिक्रापूर ग्रामनगरीचे सरपंच रमेश गडदे यांचा सन्मान

राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने शिक्रापूर ग्रामनगरीचे सरपंच रमेश गडदे यांचा सन्मान

शिक्रापूर ग्रामनगरीच्या नावलौकिकात अनमोल भर

कोरेगाव भीमा – दिनांक २५ डिसेंबर
शिक्रापूर (ता.शिरूर) ग्राममनगरीचे सरपंच रमेश गडादे यांच्या विकास कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृह या ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सरपंच रमेश गडदे यांचा सन्मान बाबासाहेब पावसे पाटिल, माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे ,छोटा पुढारी घनशाम दराडे, रोहित संजय पवार, अमोल शेवाळे,रविंद्र पावसे, सुजाता कासार यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या विविध विकास कामांचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे

आदर्श सरपंच पुरस्कार शिक्रापूर ग्रामनगरीचे प्रथम नागरिक रमेश गडदे यांना सन्मानपत्र , सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यांच्या दोन वर्षाच्या सरपंच पदाच्या कार्यकाळातील आदर्श कार्याची दखल घेऊन स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुरस्कार देण्यात येऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी समवेत रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, त्रिनयण कळमकर, कृष्णा सासवडे, मोहिनी युवराज मांढरे, उषा राऊत, शालिनी राऊत ,सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काळोखे इ‌.उपस्थित होते

राज्यस्तरीय पुरस्कार देशासाठी बलिदान देणारे सैनिक, शेतकरी,कामगार,वंचित घटक व शिक्रापूर ग्रामनगरीच्या सर्व समाज घटकांना समर्पित करत असून यापुढे गोरगरीब जनतेची सेवा करणार असून शिक्रापूर ग्रामनगरीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास कामे करणार आहे. –आदर्श सरपंच रमेश गडदे, ग्रामनगरी शिक्रापूर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!