Monday, September 16, 2024
Homeताज्या बातम्याराजकीय नेत्यांच्या सभा उधळणार - मराठा क्रांती मोर्चा

राजकीय नेत्यांच्या सभा उधळणार – मराठा क्रांती मोर्चा

पुणे – मराठा समाजास आरक्षण दिल्याशिवाय मंत्री आमदार खासदार यांनी पिंपरी चिंचवड शहरात कार्यक्रम घेण्याचे धाडस करू नये असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी देण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरात मराठा बांधवांचे साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता उपोषण स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठा बंधू भगिनींनी व इतर समाजाच्या संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

     सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची उपोषण स्थळी बैठक झाली. यावेळी मराठा समाजास कायमस्वरूपी टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय कोणत्याही आमदार खासदार व मंत्र्यांनी शहरात जाहीर कार्यक्रम घेऊ नये अन्यथा सदर कार्यक्रम मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संविधानानिक मार्गाने उधळण्यात येईल येईल असा इशारा उपस्थितीतांनी दिला

 यावेळी आज उपोषण स्थळी कामगार नेते कैलास कदम, कामगार नेते काशिनाथ नखाते, हरीष मोरे,मारुती भापकर,सुभाष साळुंखे,अरूण पवार,गौतम चाबुकस्वार,मनोज गरबडे, राजाभाऊ गोलांडे, विलास भालेकर,कल्पना गिड्डे,विष्णुपंत तांदळे,राजेंद्र कुंजीर,उदयसिंह पाटील,इत्यादी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीस उपस्थित राहून पाठिंबा दिला सरकार मराठा समाजाच्या मागणीबाबत टाळाटाळ करत आहे सदर आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न करत आहे आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा इरादा आहे अशा तीव्र स्वरूपाच्या भावना उपस्थितांनी आपल्या  मनोगतात व्यक्त केल्या. सतीश काळे,मीरा कदम,वैभव जाधव,प्रकाश जाधव,मोनल शिंत्रे,संजिवनी पुराणिक,नकुल भोईर,सतिश चांधेरे,अभिषेक म्हसे,काशिनाथ जगताप,संदीप नवसुपे,रावसाहेब गंगाधरे,संतोष शिंदे,सचिन पवार निलेश बदाले सिद्धार्थ शिरसाट,गणेश आहेर,मोहन जगताप,पांडुरंग प्रचंडराव इत्यादी कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!