Thursday, July 25, 2024
Homeक्राइमधक्कादायक ..शिरूर तालुक्यात बनावट नोटा बनवणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,बनावट नोटा रॅकेटचे...

धक्कादायक ..शिरूर तालुक्यात बनावट नोटा बनवणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,बनावट नोटा रॅकेटचे दिल्ली कनेक्शन बाबत पोलिसांना संशय

शिरूर मध्ये सदनिकेत बनावट नोटा होता छापत, एकाच नंबरच्या ३० हजाराच्या नोटासह ,नोटा तयार करण्यासाठीचे पांढरे कागद, कलर प्रिंटर स्कॅनर, हिरव्या रंगाची पावडर, छाप्याची लाकडी फ्रेम, वेगवेगळ्या रंगाचे कलर स्प्रे. इत्यादी साहित्य जप्त

कोरेगाव भिमा – रांजणगाव ( ता.शिरूर) येथे भारतीय चलनातील बंवात नोटा घेऊन आलेल्या ३० हजारांच्या बनावट नोटांसह साहित्य जप्त करत बेड्या ठोकल्या असून  सदरच्या नोटांपैकी बहुतांश नोटांवरती एकच नंबर असून सदरच्या नोटा या त्याने शिरुर, रामलिंग रोड येथील तो राहण्यास असलेल्या फ्लॅटमध्ये स्वतःच तयार केल्या असून या गुन्ह्याचे धागेदोरे दिल्ली कनेक्शन असण्याची शक्यता असून पोलीस याबाबत अधिकचा कसून तपास करत आहेत.

दि.११ डिसेंबर रोजी  सकाळी आठच्या सुमारास रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतमधील कारेगाव यशईन चौक येथे एक इमस ॲक्टिव्हा स्कुटी मोटार सायकल क्र. एम एच ३४ सी ई ११३४ वरुन भारतीय बनावटीच्या बनावट चलनी नोटा घेवुन येणार असल्याची माहिती पो.कॉ. विजय शिंदे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत मिळाली होती. सदरची बातमी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना सांगीतल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  शिवाजी मुंढे, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो. हवा. विलास आंबेकर, पो.कॉ. उमेश कुतवळ व पो.कॉ. विजय शिंदे यांचे पथक तयार करुन  दोन पंचासह  कारेगावचे हद्दीतील यशईन चौकातील यझाकी कंपनीजवळ सापाळा लावुन थांबले.

      त्यानंतर ९ च्या सुमारास तपास पथकास मिळालेल्या माहितीनुसार एक इसम ॲक्टिव्हा स्कुटी मोटारसायकल वरुन MIDC मधील अंतर्गत रोडने जातांना दिसला. त्यावेळी सापाळा लावुन थांबुन राहिलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्यांचेकडील खाजगी वाहनाने त्याचा पाठलाग करुन त्यास  मनिष अमर पाल वय २४ वर्षे, रा. रेवाना, जि. घाटमपुर, उत्तरप्रदेश याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ५००/रु. दराच्या ६० नोटा अशा एकुण ३०, ०००/रु. च्या बनावट चलनी नोटा मिळुन आल्या. सदरच्या नोटांपैकी बहुतांश नोटांवरती एकच नंबर असल्याने सदरच्या नोटा या बनावट असल्याची पोलीसांची खात्री झाली असता सदरच्या नोटा पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे यांनी सोबतच्या पंचासमक्ष पचंनामा करुन जप्त केल्या. 

     त्यानंतर सदर इसमास सदरच्या नोटा कोठुन आणल्या याबाबत विचारणा केली असता त्याने सदरच्या नोटा या त्याने शिरुर, रामलिंग रोड येथील तो राहण्यास असलेल्या फ्लॅटमध्ये स्वतःच तयार केल्या असल्याचे सांगीतले. त्यामुळे पोलीस स्टाफ व पंच असे आरोपी मनिष अमर पाल यास घेवुन तो राहण्यास असलेल्या शिरुर, रामलिंग रोड येथील खोलीमध्ये जावुन पाहिले असता त्या ठिकाणी भारतीय बनावटीच्या बनावट चलनी नोटा तयार करण्यासाठीचे साहित्य त्यामध्ये नोटा तयार करण्यासाठीचे पांढरे कागद, कलर प्रिंटर स्कॅनर, हिरव्या रंगाची पावडर, छाप्याची लाकडी फ्रेम, वेगवेगळ्या रंगाचे कलर स्प्रे. इत्यादी साहित्य मिळून आले आहे.

सदर प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला आरोपी  मनिष अमर पाल वय २४ वर्षे, रा. रेवाना, जि. घाटमपुर, उत्तरप्रदेश याच्याविरुध्द गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला मा.कोर्टाने दि. २३ डिसेंबर  पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. 

बनावट नोटांचे रॅकेटचे धागेदोरे दिल्ली पर्यंत – सदर गुन्ह्यातील बनावट नोटांचे रॅकेटचे धागेदोरे हे दिल्ली पर्यंत असण्याची शक्यता असुन पोलीस त्याबाबत पुढील अधिक तपास करत आहेत.
पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा व त्या तयार करण्यासाठीचे साहित्य मिळुन आले असल्याने सदर गुन्ह्याचा सखोल तपास करणे बाबतच्या सुचना पोलीस अधिक्षक अंकित गोयल  यांनी दिल्या आहेत.

सदरची कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक  अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर विभाग यशवंत गवारी  यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा. पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, विजय शिंदे, पो. हवा. विलास आंबेकर, संतोष औटी, अभिमान कोळेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, रांजणगाव MIDC पो.स्टे. हे करीत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!