Saturday, June 22, 2024
Homeक्राइमरक्षकच झाले भक्षक...पोलीस आणि होमगार्ड या दोघांनी केला महिलेवर बलात्कार

रक्षकच झाले भक्षक…पोलीस आणि होमगार्ड या दोघांनी केला महिलेवर बलात्कार

 ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’ हे ब्रीद वाक्य असणाऱ्या पोलीस खात्यातील पोलीस आणि होमगार्ड यांचे अत्यंत घृणास्पद कृत्य समोर आले आहे. जामखेड तालुक्यातील  छोट्याश्या गावात राहणारी पारधी समाजाच्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना भुम तालुक्यात घडली आहे.

यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भूम जि. उस्मानाबाद येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका पारधी समाजाच्या महिलेवर २ पोलिसांनी अत्याचार केलाय. त्यातील १ आरोपी होमगार्ड, तर दुसरा पोलीस शिपाई आहे.

पीडित महिला ऊसतोड मजूर असून ती तिच्या मुलांना भेटायला बार्शी येथे जात असतांना बस स्टँडवर आरोपींनी पीडित आणि तिचा दिर थांबले असतांना त्यांना ‘चोर’ असल्याच्या संशयावरून गाडीत बसवून नेले आणि पैशांची मागणी केली. पीडित महिलेने ऊसतोड मुकादमाकडून उसने पैसे घेऊन आरोपी पोलिसांच्या मोबाईलवर पैसे दिले.

यानंतर पुन्हा आरोपी पोलिसाने महिलेला दमदाटी करून महिलेवर अत्याचार केला आणि पीडितेला धमकावले. 

या घटनेवरून राज्याच्या कायद्या आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय. एकीकडे खुलेआम पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो, तर दुसरीकडे कायद्याचे रक्षकच भक्षक होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

या सर्व प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पीडित महिलेची भेट घेऊन त्यांना धीर दिला. ‘वंचित’चे नेते अरुण जाधव यांनी हे प्रकरण लावून धरले.

प्रशासन आणि सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका सामान्य जनतेला बसतोय. गृहमंत्र्यांचे हे सपशेल अपयश आहे. आरोपींना कठोर शिक्षा केली जावी. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर होत चाललाय, हे स्पष्ट होत असल्याचे मत आंबेडकरांनी व्यक्त केले.

पिडीत महिलेने घडलेला प्रकार ऊसतोड मुकादम आणि तिच्या वडिलांना सांगितला. पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस कर्मचारी दगडू सुदाम भुरके पोलीस ठाणे, भुम व सागर चंद्रकांत माने. रा. भुम जिल्हा उस्मानाबाद या दोघांविरुद्ध भुम पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पीडितेला ॲड. अरुण जाधव आणि विलास पवार यांनी मदत केली. या पीडितेला मदत करण्यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!