Friday, July 26, 2024
Homeस्थानिक वार्तायुवानेते ऋषिराज पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम संपन्न

युवानेते ऋषिराज पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम संपन्न

वृक्षारोपण व भाविकांना केले फराळ वाटप

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथे युवानेते ऋषिराज पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र ऋषिराज पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र नरेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.तसेच श्रावणी सोमवार निमित्त भाविक भक्तांना फराळ वाटप करण्यात आले.यावेळी स्वतः ऋषीराज पवार यांनी स्वतः भाविक भक्तांना फराळ वाढण्याचे काम केले. श्री नरेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात श्रावणी सोमवार निमित्त भाविक भक्तांची गर्दी होती.

यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री पंडित आप्पा दरेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ हरगुडे, चेअरमन सुहास दरेकर, समता परिषद जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, माजी चेअरमन गोरख दरेकर, नवनाथ दरेकर माजी सदस्य रामभाऊ दरेकर, सुभाष दरेकर, माजी सदस्य अनिल दरेकर, प्रशांत दरेकर, सुखदेव दरेकर, बबन दरेकर, बापू दरेकर, शाम दरेकर, निलेश दरेकर, अनिल गोटे, प्रकाश जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!