Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यायुवकाच्या अपघाती निधनाने कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करत जपली संवेदनशीलता

युवकाच्या अपघाती निधनाने कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करत जपली संवेदनशीलता

कोरेगाव भीमा गावावर दुःखद शोककळा

कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी संवेदनशीलता जपत प्रजासत्ताक दिनाचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करत फक्त ध्वजावंदन करत गव्हाणे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत गावाचे गावपण व सुख दुःखाचे नाते जपत अनोख्या माणुसकीचे व गावच्या एकीचे दर्शन घडवले आहे. तसेच ग्राम पंचायतीच्या वतीने पुणे नगर महामार्गावर कोल्हापुर महामार्गाच्या धर्तीवर स्पीडब्रेकर / रंबलर बसविण्याची बांधकाम विभागाकडे मागणी करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील महेश राजाराम गव्हाणे ( वय २५) यांचे वाडा पुनर्वसन फाट्यावर अपघाती निधन झाल्याने कोरेगाव भीमा ग्रामस्थांवर दुःखाची शोककळा पसरली तसेच ऐन तारुण्यातील गावातील दोन युवकांचे निधन झाल्याने ग्रामस्थांनी आपली संवेदनशीलता जपत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त नियोजित सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करत गव्हाणे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत गावाचे गावपण व सुख दुःखाचे नाते जपत अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

कोरेगाव भीमाचे नवनिर्वाचित सरपंचपदी विक्रम गव्हाणे यांची निवड झाल्याने प्रजासत्ताक दिनाचे आयोजन दिमाखदार करण्यात आले होते.यासाठी कोरेगाव भिमा येथील बाजार मैदानात स्टेज व मंडप सजवण्यात आला होता तसेच साऊंड व्यवस्था करण्यात आली होती. शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी केली होती पण गावातील महेश गव्हाणे यांचे अपघाती निधन झाल्याने गवावावर शोककळा पसरली तसेच आपल्या तरुण बंधवाचे निधन झाल्याने ग्राम पंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी संवेदशीलतेने सर्व कार्यक्रम रद्द करत फक्त ध्वजावंदन करत माणुसकी धर्म पाळत गव्हाणे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले.

गावातील तरुणाचे पुणे अहमदनगर महामार्गावर अपघाती निधन झाल्याने ग्राम पंचायतीच्या वतीने बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला . या पत्रांमध्ये पुणे-नगर हायवे वर वाडागाव फाटा येथे दोन अपघात झाले. त्यामध्ये दोन मृत्यू झालेनंतर आपघातामध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाली असल्याने पुणे – नगर महामार्गावर कोल्हापुर महामार्गाच्याधर्तीवर पुण्याकडून नगरकडे जाताना पुलाच्या जवळ गणेश भुवन समोर, डिंग्रजवाडी फाटा , वाडागाव फाटा, वढू चौक याठिकाणी वाहनांची गती जास्त असल्याने अपघात जास्त होत आहे तरी सदर ठिकाणी कोल्हापुर महामार्गाच्या धर्तीवर स्पीडब्रेकर / रंबलर बसविणे आवश्यक आहे तरी तात्काळ स्पीडब्रेकर / रंबलर बसवून द्यावे हि विनंती.करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा येथील ग्राम पंचायतीच्या वतीने पुणे नगर महामार्गावर कोल्हापुर महामार्गाच्या धर्तीवर स्पीडब्रेकर / रंबलर बसविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येणार आहे. मिलिंद बारभाई,मुख्य कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पुणे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!