Saturday, November 9, 2024
Homeस्थानिक वार्ताचिंचोली मोराची येथील नवज्योत ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून हळंदी कुंकु कार्यक्रम संपन्न

चिंचोली मोराची येथील नवज्योत ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून हळंदी कुंकु कार्यक्रम संपन्न

कार्यक्रम प्रसंगी उपस्थित पुणे जिल्हा परिषद सदस्य स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील व स्मिता शेखर पाचुंदकर पाटील व महिला भगिनी

कोरेगाव भीमा – शिरूर

शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची मध्ये नवज्योत ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून हळंदी कुंकु कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमानिमित्त विविध सार्वजनिक उपक्रम करण्यात आले होते.वृक्षारोपण केलेल्या झाडांना आळे करणे, झाडाना पाणी देणे, शाळेच्या परिसरात इतर ठिकाणी साफसफाई अशी विविध कामे करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले की महिलानी एकञ येऊन संवाद साधून एकजूटने गावच्या विकासला हातभार लावला पाहिजे.महिला सशक्तिकरणची आवश्यकता आहे.हळंदी कुंकुच्या कार्यक्रमाने सगळे एकञ आले.अशी एकजूट दाखवली पाहिजे असे नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन माध्यमातून सांगण्यात आले.

हळंदी कुंकु कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा परिषद सदस्य स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील स्मिता शेखर पाचुंदकर पाटील ,शितल नाणेकर, आनंदी नाणेकर,भारती धुमाळ ,महिला कल्याण अध्यक्ष रूपाली उकिर्डे ,महिला कल्याण उपाध्यक्ष छाया उकिर्डे यांनी हळंदी कुंकुचे आयोजन केले होते. आनंदी नाणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!