Friday, July 12, 2024
Homeराजकारणमोरगिरीत सत्तांतर, राष्ट्रवादीला धक्का देत मंत्री शंभूराज देसाई यांची ६०...

मोरगिरीत सत्तांतर, राष्ट्रवादीला धक्का देत मंत्री शंभूराज देसाई यांची ६० वर्षानंतर एकहाती सत्ता

हेमंत पाटील सातारा

सातारा – दिनांक १५ ऑक्टोंबर पाटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेली मोरगिरी ग्रामपंचायतीत तब्बल ६० वर्षांनी सत्तांतर झाले आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने पाटणकर गटाला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला असून शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई गटाने एकहाती ७-० सत्ता व लोकनियुक्त सरपंच पदी अर्चना किरण गुरव यांनी जवळपास पावणेतीनशे मतांनी विजय मिळवला आहे. तर घाणव ग्रामपंचायत पाटणकर गटाने स्वतःकडे राखण्यात यश मिळवले. त्यामुळे दोन ग्रामपंचायतीत १-१ अशी बरोबरी झाली. परंतु सत्तांतरामुळे पाटणकर गटाला धक्का बसला आहे.

मोरगिरी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वात तब्बल ६० वर्षे सत्तेत होती. अखेर या मोरगिरी विभागातील अत्यंत महत्वाची असणाऱ्या ग्रामपंचायतीत शंभूराज देसाई यांच्या गटाने धक्का देत मोठे खिंडार पाडले. मोरगिरी ग्रामपंचायतीसाठी १ हजार २५८ मतदारांपैकी ९८५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होती. घाणव येथे ५३२ मतदारापैकी ३६५ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

मोरगिरी ग्रामपंचायतीत निवडूण आलेले नवनिर्वाचित उमेदवार सचिन कृष्णाजी मोरे, सरीता कृष्णत कुंभार, वैशाली सचिन मोरे, संदीप गजानन सुतार, सुनिता सुरेश गुरव, जगन्नाथ परशराम माने, निर्मला रावसाहेब चव्हाण यांचा समावेश आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!