Saturday, June 22, 2024
Homeताज्या बातम्यामोठी दुर्घटना ..रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर (Irshalgad) कोसळली दरड

मोठी दुर्घटना ..रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर (Irshalgad) कोसळली दरड

मुसळधार पावसामुळं बुधवारी रात्री रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (Irshalgad) (इर्शाळगड ) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली असून यामध्ये १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत २५ लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

रात्री नेमकं काय घडलं? – रात्री पाऊस पडत होता, आम्ही सगळे घरात झोपलो होतो. तितक्यात मोठा आवाज झाला, त्यामुळे आम्ही घाबरलो, तातडीनं मुलाबाळांना घेऊन घरातून बाहेर पडलो. बाहेर आलो तेव्हा अनेक घर दरडीखाली गेल्याचे दिसून आले. मोठी झाडे पडली होती. आमचे घर खचले आम्ही तिथून खाली आलो असं या दुर्घटनेत वाचलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

गावात ५० ते ६० घरे असून २०० ते ३०० मतदार – या गावात ५० ते ६० घरांची वस्ती असून जवळपास २०० ते ३०० मतदार असल्याची माहिती मिळाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे ३० ते ४० घरातील लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही लँड्स लाईडची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यामधील इर्शाळवाडी इथं ही घटना घडली आहे. NDRF चे बचावकार्य सुरु आहे. डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे. आता पर्यंत २५लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे.यात ४ जणांच्या दुर्दैवी मृत्यू झाली आहे. आतापर्यंत २५लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी इर्शाळवाडी गाव आहे. आणखी खालच्या बाजुला चौक नावाचे गाव आहे. नेताजी पालकर यांचे मुळ गाव आहे. इर्शाळगडच्या पायथ्याला असलेल्या या वाडीत प्रामुख्याने आदिवासी समाजाची वस्ती आहे.

माळीण आणि तळीयेची पुनरावृत्तीइर्शाळवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. तळीये गावातील ३५ घरांवर दरड कोसळली होती, यामध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला होता. तर माळीणमध्ये १५१ जणांनी आपले प्राण गमावले होते. सकाळी माळीण गावावर डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ माळीण गावातील ७४ पैकी ४४ घरे दबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब! यामध्ये १५१ जणांचा प्राण गेला होता. याच दुर्घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली आहे. इर्शाळवाडी मधील तीस पेक्षा जास्त घरावर दरड कोसळली आहे. मलब्याखाली १०० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ इरशाळगड येथील दुर्देवी घटनेचा आढावा घेतला. त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले असून जिल्हाधिकारी व प्रांत यांच्याकडून सद्य परिस्थितीचा आढावा घेत असून केंद्र शासनाची आवश्यक ती मदत मिळणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे सांगितलें.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचले आहेत.याबाबत त्यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले ट्विट.. खालापूर (जि. रायगड) येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री @mieknathshinde हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत.प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. एनडीआरएफ (NDRF) पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून आत्ताच केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1681867529881542657?s=20

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटर द्वारे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे.महाराष्ट्रातील रायगड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाबाबत मुख्यमंत्री श्री @mieknathshinde यांच्याशी बोलणं केलं आहे. NDRF च्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचाव कार्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे हे आमचे प्राधान्य आहे.

https://twitter.com/AmitShah/status/1681869520955392002?s=20

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!