Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यामोझे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये Technomeet 2023 मोठ्या उत्साहामध्ये साजरा

मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये Technomeet 2023 मोठ्या उत्साहामध्ये साजरा

कोरेगाव भीमा – वाघोली (ता.शिरूर) येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या महाविद्यालयात Technomeet २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.( CAD QUEST,CROSS OVER,CADE WAR,FREE FIRE , CIRCUIT MAKING ) अशा विविध कार्यक्रमाचे नियोजन केल्याने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठातील महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभागी होत पाचशेच्यावर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उपस्थित होते.

यावेळी मोझे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे साहेब यांनीही सर्व मुलांना मार्गदर्शन करून सर्व टेक्नॉलॉजी मध्ये निष्णात व पारंगत होऊन अद्यवत राहण्याचा सल्ला दिला.संस्थेचे डायरेक्टर डॉ.जाधव सर ,प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे सर ,डीन प्रो.विजय राठी सर ,संगणक क्षेत्राचे विभाग प्रमुख प्रो. श्रीकांत ढमढेरे सर ,आयटीचे विभाग प्रमुख प्रो. शेख सर, मेकॅनिकल चे विभाग प्रमुख पांचाळ सर, सिव्हिल चे विभाग प्रमुख आरशी खान मॅम, एन टी सी चे विभाग प्रमुख प्रो. सोमणी मॅम हे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते व प्रो. नेहा घावटे , प्रो.जयश्री शिल्पकार, डॉक्टर गार्गी यादव, प्रो.किरण खेडकर, प्रो.चैताली हिमाने या सर्वांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते‌ व‌ प्रा.प्रमोद ढमढेरे व प्रा.महेश परदेशी हे कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम बघत होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!