Saturday, June 22, 2024
Homeशिक्षणमोझे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ए डब्ल्यू एस क्लाऊड कम्प्युटिंग या विषयावर एक दिवसीय...

मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ए डब्ल्यू एस क्लाऊड कम्प्युटिंग या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न

कोरेगाव भीमा – दिनांक ६ सप्टेंबर
वाघोली ( ता.हवेली) येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या महाविद्यालयात संगणक विभागाने आयोजित केलेल्या ए डब्ल्यू एस अँड क्लाऊड कम्प्युटिंग या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये ८८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
यावेळी बाईट स्क्वेअर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक तुषार काफरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत क्लाऊड कम्प्युटिंग मधील जॉब अपॉर्च्युनिटी याबद्दलही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृती निर्माण केली.
यावेळी मोझे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे , डॉ एम जी जाधव सर, डॉ नवनाथ नरवडे सर, राठी सर, संगणक विभागाचे प्रमुख श्रीकांत ढमढेरे सर आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते व रुपाली वाघ मॅडम, दीपिका दाभाडे मॅडम, मीनल राऊत मॅडम, जयश्री शिल्पकार मॅडम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले श्री प्रमोद ढमढेरे सर यांनी त्यांचे आभार मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!