रंकाळा ग्रुपची अनोखी शक्कल, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल.
मित्राच्या आरोग्याची काळजी घेणारा व सामाजिक बांधिलकी जपणारा रंकाळा ग्रुप म्हणजे निरोगी आरोग्य ,मन, मैत्री, माणूसकी व सामाजिक बांधिलकी जपणारा रंकाळा ग्रुप
बीड -‘ सकाळी नक्की व्यायामाला येतो असे म्हणून कित्येकदा व्यायामाला दांडी मारणे आता सर्वांनाच अंगवळणी पडले आहे. पण बीडमधील एका मित्राला व्यायामाला एक दिवस दांडी मारण्याने चक्क राज्यभर प्रसिद्ध केले आहे.व्यायामाला दांडी मारणाऱ्या मित्राला झोपेतून उठविण्यासाठी चक्क बँड पथक लावून बहारो फुल बरसावो…. असे गणे वाजवत त्याला जागे करत साग्रसंगीत मित्राच्या आरोग्याची काळजी घेणारी मित्र काही औरच आणि त्यांची मैत्री ही निराळीच असून यातून मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा ही प्रचिती आली असून मित्रासह इतरांनीही आरोग्याची काळजी घ्यावी हा संदेश देणारी मित्र मंडळी सोशल मीडियावर मात्र चांगलीच प्रसिद्ध झाली आहेत.
दि.१६ रोजी सकाळी असाच मित्राच्या दारात बँडबाजा वाजविताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला सद्या याच व्हिडीओची चर्चा राज्यात तुफान चर्चा सुरू आहे.बीड येथे रंकाळा नावाचा ग्रुप सक्रिय आहे. चार वर्षांपूर्वी कारागृह अधिक्षक महादेव पवार यांनी या ग्रुपची स्थापना केली. मोजकेच मित्र ग्रुपमध्ये घेण्यात आले असून यामध्ये अधिकारी, कर्मचारी, राजकिय पुढारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ग्रुप सुरू केल्यापासून रोज सकाळी व्यायामला येण्याचा ग्रुपचा नियम आहे. जे येणार नाहीत त्यांच्या घरी ग्रुपचे जवळपास १४ सदस्य सकाळी सकाळी नाश्त्याला हजर होत असतात परंतु दि.१६ रोजी पंचायत समिती सदस्य बळीराम गवते मॉर्निंग वॉकला आले नाहीत. यानंतर मित्रांनी आज वेगळं काही तरी करू, असे म्हणत अनेक कल्पना मांडल्या. यातील एक कल्पना होती, थेट अँड पथक घरी नेण्याची. यावरच शिक्कामोर्तब झाले. यानंतर अवघ्या काही वेळेत बँड पथक मॅनेज केले.
सकाळी ७ वाजता हे बँडपथक शहरातील चाणक्यपुरीतील बळीराम गवते यांच्याघरी पोहलचे याठिकाणी ‘बहारो फुल बरसाओ’, अशी एका सरस एक गाणी वाजविण्यात आली. यानंतर गवते तर झोपेतून उठलेच पण अवघी कॉलनी जागी झाली. या बँडचा व्हिडीओ यानंतर सोशल मिडीयावर टाकण्यात आला आणि बघता बघता तो राज्यात व्हायरल झालेला आहे.
ग्रुपमध्ये अध्यक्ष ॲड प्रकाश कवठेकर, पंचायत समिती सदस्य बळीराम गवते, अशोक सुखवसे, वरिष्ठ तुरूंग अधिकारी महादेव पवार , शिवाजी शिंदे, विजय लाटे, पत्रकार संदिप लवांडे, रतन बहिर, तुकाराम पवार , अमोल पवार,लक्ष्मण बारगजे, प्रशांत उगले, गणेश सांवत, ॲड सचिन पठारे आदिंचा समावेश आहे.