कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत सणसवाडी येथे शहिदांच्या शिलाफलकाचे अनावर करण्यात येऊन शिलाफलका समोर पंचप्राण शपथ घेण्यात आली. स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत’मेरी मिट्टी मेरा देश’ या वसुधा वंदन अंतर्गत सणसवाडी येथील नरेश्वर मंदिर परिसरामध्ये वृक्षाची लागवड करण्यात आली.
केंद्र शासनाच्या वतीने देशभर करण्यात येणाऱ्या मेरी मिट्टी नेरा देश या उपक्रमांतर्गत भारत मातेची सेवा करणारे, सेवानिवृत्त सैनिक यांचा सणसवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने शाल ,श्रीफळ, बुके व एक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले . सदर कार्यक्रमासाठी सर्व सेवानिवृत्त सैनिक ,सणसवाडी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी वर्ग व सणसवाडीचे ग्रामस्थ देखील उपस्थित होते .
यावेळी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, स्नेहल राजेश भुजबळ, संगीता नवनाथ हरगुडे, माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर, सागर दरेकर, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, शशिकला सातपुते,रुपाली दरेकर,ललिता दरेकर,तनुजा दरेकर, राजेंद्र दरेकर, अक्षय कानडे, राहुल हरगुडे, मोहन हरगुडे,ग्रामसेवक बाळनाथ पवणे,जॉन डीअर कंपनीचे सर्व कर्मचारी ,ग्राहक पंचायत चे अशोक बापू दरेकर ,संतोष बापू दरेकर आदिनाथ हरगुडे सिताराम कांचन विश्वनाथ हरगुडे, दत्तात्रय दरेकर,वामन दरेकर,शंकर दरेकर,विजय दरेकर लहू धुमाळ, विकास भुजबळ, चंद्रकांत लांडगे, सचिन दरेकर, संतोष यादव, सतीश दरेहर, बाळकृष्ण खंबाट, बाळासाहेब महाजन हे सैनिक व सणसवाडी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी,व ग्रामस्थ उपस्थित होते.