Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यामेटा कंपनीच्या इन्स्टाग्रामने ट्विटरशी स्पर्धा करणायाठी थ्रेड्स (Threads ) नावाचे ॲप केले...

मेटा कंपनीच्या इन्स्टाग्रामने ट्विटरशी स्पर्धा करणायाठी थ्रेड्स (Threads ) नावाचे ॲप केले लॉन्च

मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या मेटाने (Meta) नुकतेच थ्रेड्स (Threads ) अ‍ॅप लाँच केले आहे. हे अ‍ॅप इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरला (Twitter ) टक्कर देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मेटाने थ्रेड्स अ‍ॅपमध्ये ट्विटरसारखे सर्व फीचर्स दिले आहेत. यामध्ये पोस्टची लिमिट ५०० वर्ड्सची दिली जात आहे, जी ट्विटरच्या २८० वर्ड्स लिमिटपेक्षा जास्त आहे आणि सोबतच त्यात आपण पाच मिनिटांपर्यंतच्या लिंक्स, फोटो आणि व्हिडिओंचा समावेश सुद्धा करू शकतो.(Instagram Threads App)

मेटा कंपनीच्या इन्स्टाग्रामने आपलं एक नवीन अ‍ॅप लाँच केलं आहे. हे एक टेक्स्ट बेस्ड कनव्हर्सेशन अ‍ॅप आहे. ‘थ्रेड्स’ नाव असलेलं हे अ‍ॅप थेट ट्विटरला टक्कर देणार आहे. त्यामुळे इलॉन मस्कचं टेन्शन वाढलं आहे. (Instagram Threads App)

 इन्स्टाग्राम हे मुख्यत्वे फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठीचं अ‍ॅप आहे. तर, थ्रेड्स हे शब्दांच्या माध्यमातून विचार शेअर करण्यासाठीचे अ‍ॅप असणार आहे. अशी माहिती मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अ‍ॅप लाँच करताना दिली. (Instagram Threads App)थ्रेड्स हे इंस्टाग्रामचे नवीन अ‍ॅप आहे,जे युजर्सना टेक्स्ट, लिंक शेअर करण्याची आणि इतर युजर्सच्या मेसेजना उत्तर देऊन किंवा पुन्हा पोस्ट करून कन्व्हर्सेशनमध्ये सामील होण्याची कॅपॅबिलिटी देते. अ‍ॅप युजर्सना आपल्या विद्यमान इंस्टाग्राम अकाउंट युजर्सच्या नावाने लॉग-इन करण्याची आणि आपल्या फॉलोअर्सच्या लिस्टला फॉलो करण्याची परवानगी देते. म्हणजेच, यासाठी तुम्हाला वेगळे युजर्सचे नाव सेट करण्याची गरज नाही. दरम्यान, मेटा हे लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा युजर्स बेस २ बिलियनपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये टॉप ब्रँड, प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि कंटेंट क्रिएटर्स सामील आहेत.

दोन्ही प्लॅटफॉर्मवर लाँच

थ्रेड्स हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि अ‍ॅपल अशा दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी लाँच करण्यात आलं आहे. १००हून अधिक देशांमध्ये हे अ‍ॅप लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. गुगलच्या प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुन हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.

 थ्रेड्स अ‍ॅपचा थेट फटका ट्विटरला बसणार आहे. इलॉन मस्कने विकत घेतल्यानंतर ट्विटर अ‍ॅपमध्ये बरेच बदल झाले आहेत. तसेच, यूजर्सवर देखील मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू केले जात आहेत. यामुळे, कित्येक ट्विटर यूजर्स एक नवीन पर्याय शोधत असतानाच इन्स्टाग्रामने हे अ‍ॅप लाँच करून संधी साधली आहे.

इन्स्टाग्राम अकाउंट अनिवार्य
हे अ‍ॅप इन्स्टाग्रामने लाँच केलं असल्यामुळे, याचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे इन्स्टाग्राम अकाउंट असणं अनिवार्य आहे. तुम्ही आपलं इन्स्टाग्रामचं यूजरनेम थ्रेड्सवर देखील वापरू शकाल.

थ्रेड्स अ‍ॅप अमेरिका (America), ब्रिटन (Britain), ऑस्ट्रेलिया (Australia), कॅनडा (Canada) आणि जपानसह (Japan) १०० हून अधिक देशांमध्ये अ‍ॅपल आणि गुगल अँड्राईड अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. म्हणजेच आता यूजर्स अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून ट्विटरचे रिव्हल अ‍ॅप थ्रेड्स इंस्टॉल करून याचा फायदा घेऊ शकतात. मेटाचे मुख्य कार्यकारी मार्क झुकरबर्ग यांच्या थ्रेड्सवरील पोस्टनुसार, हे अ‍ॅप १ बिलियनहून अधिक युजर्ससह पब्लिक कन्व्हर्सेशन अ‍ॅप असल्याचे सिद्ध होण्याची शक्यता आहे.

नवीन थ्रेड्स ॲप Google Play Store आणि Apple App Store या दोन्हीवर आहे त्यावरुन आपण डाउनलोड करु शकतो.

Play Store किंवा App Store वर गेल्यानंतर आणि शोध विंडोमध्ये Instagram द्वारे थ्रेड्स शोधल्यानंतर, तुम्हाला ॲप्सची सूची दिसेल.

यासाठी आपल्याला थ्रेड्स हे इन्स्टाग्राम ॲप डाउनलोड करावे लागेल.

या ॲपचे आयकॉन ‘@’ या चिन्हासारखे असून ते इन्स्टाग्रामने विकसित केले आहे.

ॲप सुरू करण्याची पद्धत
थ्रेड्स अकाउंट ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही ते ओपन करताच तुम्हाला इन्स्टाग्रामच्या मदतीने लॉग इन करण्याचा पर्याय दिला जाईल.

जर तुमचे इस्टाचे अकाउंट असेल तर तुम्हाला त्यात फक्त दिलेल्या प्रोसेसवर टॅप करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे आहे व आपले प्रोफाइल सेट करायचे आहे.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही इंस्टाग्रामवरून प्रोफाईल बायो आणि लिंक्सची माहिती सारखीच ठेवू शकता

शेवटी ‘Join Threads’ वर टॅप केल्यानंतर, तुम्ही ते वापरण्यास सक्षम व्हाल.

https://www.instagram.com/p/CuVVaOMPNOT/?igshid=MzRlODBiNWFlZA==

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!