Friday, July 12, 2024
Homeस्थानिक वार्तामृत्यूशी सुरू असलेली विघ्नेश पवार यांची अडीच महिन्यांनी झुंज अखेर अपयशी

मृत्यूशी सुरू असलेली विघ्नेश पवार यांची अडीच महिन्यांनी झुंज अखेर अपयशी

विघ्नेशच्या उपचारासाठी कोरेगाव भीमा पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केली होती मदत

विघ्नेश याच्या जाण्याने कोरेगाव भिमासह पंचक्रोशीत शोककळा

कोरेगाव भीमा
गेली अडीच महिने मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली, असंख्य दानशुरांच्या पाठबळावर मृत्यूला अडीच महिने झुंजवले, त्याच्यासमोर हार न मानता मोठ्या धैर्याने व हिंमतीने लढणाऱ्या , झुकेगा नही … असे म्हणत आपलेच नाही तर आई वडिलांसह भेटायला येणाऱ्यांचे मनोबल वाढवणाऱ्या विघ्नेशला अखेर काळाने गाठले, नियतीपुढे इलाज नाही विघ्नेश पवार यांच्या मृत्यूने कोरेगाव भिमा पंचक्रोशीतील नागरिकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या व अखेर झुंज संपली.

कोरेगाव भीमा येथील वडापाव व्यवसायिक रविंद्र पवार यांचा मुलगा विघ्नेश रविंद्र पवार याला विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये सुरू होते .त्याच्या प्रकृत्तीमध्ये सुधारणा दिसत होती.त्याला घरी आणण्यात आल्याने गावी गेलेल्या विघ्नेशच्या मृत्यूने सर्वांना दुःख झाले असून विघ्नेशने अडीच महिने मृत्यूशी झुंज दिली पण अखेर त्याला मृत्यूने गाठले.

विघ्नेश याला विजेचा धक्का लागून त्यात तो गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती पाहता त्याच्यावर उपचार करणे अशक्य होते .या कठीण प्रसंगात कोरेगाव भीमा, वढू बुद्रुकसह पंचक्रोशीतील नागरिकांनी त्याच्यावरील उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला त्याच्यावर उपचार करण्यासाठी सर्वांनी मोठा वाटा उचलला पण अखेर विघ्नेश याचा लढा अप्याशी ठरला आणि त्याला मदत करणाऱ्या ,त्याच्या प्रकृत्तीबाबत प्रार्थना करणाऱ्या सहृदय नागरिकांना दुःख झाले असून त्याच्या जाण्याने कोरेगाव भीमा परिसरावर शोककळा पसरली आहे.

विघ्नेश पवार याला उपचारासाठी मदत मिळावी यासाठी सोशल मीडियावर आवाहन करणाऱ्या अनेकांना त्याच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारे स्टेटस ठेवावे लागल्याने पापण्या ओलावल्या होत्या तर कोरेगाव भीमासह पंचक्रोशीतील नागरिकांनी विघ्नेश पवार याला अखेर झुंज अपयशी ठरली असे भावनिक स्टेटस ठेवत श्रद्धांजली अर्पण केली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!