Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यामुलांवर योग्य संस्कार करा, तीच खरी संपत्ती आहे - चंद्रकांत दादा मोरे...

मुलांवर योग्य संस्कार करा, तीच खरी संपत्ती आहे – चंद्रकांत दादा मोरे महाराज

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे आमदार अशोक पवार यांच्याकडून कौतुक

कोरेगाव भीमा – सणसवाडीतुम्हाला कुणी प्रॉपर्टी जमीन बँकबॅलन्स विचारत नाही तर, तुमची मुले काय करतात हेच विचारलं जातं ? मुलं हिच खरी संपती आहे, म्हणून मुलांना विद्यार्थी दशेतच सुसंस्कार झाले तरच भावी पिढी चांगली घडेल, स्वामी समर्थांचे चिंतन केल्यास चिंता हटेल, असे प्रतिपादन त्रंबकेश्वर गुरुपिठाचे प्रशासकीय प्रमुख चंद्रकांत दादा मोरे यांनी सणसवाडी येथे उपस्थीत भाविकांसमोर केले.

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शिक्रापूर ग्राम अभियानांतर्गत श्री स्वामी समर्थ सणसवाडी सेवा केंद्र प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभम मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मोरे बोलत होते.

सणसवाडी ( ता.शिरूर) येथील स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या प्रथम वर्धापन दिनी कार्यक्रमास आमदार अशोक पवार यांनी सपत्नीक उपस्थिती लावली.यावेळी आमदार पवार यांनी सेवा केंद्राचा हेतू गाव तेथे केंद्र व घर तेथे सेवेकरी घडवणे यासाठी वेळ, काळ न पाहता कार्यरत असतात. प्रत्येक सेवेकरी खारीचा वाटा म्हणून सेवा करत राहू तसेच आमदार पवार यांनी अशोक ढेकळे, अरुण हिरे यांची व सणसवाडी सेवा केंद्राचे कामाची प्रशंसा केली प्रशंसा केली. यावेळी कार्यसम्राट आमदार अशोक पवार युवा मंच सणसवाडी तर्फे पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडीत दरेकर यांच्याकडून सणसवाडी केंद्रास ५ लाखाची मदत तर माजी सरपंच सुरेश हरगुडे यांनी ३ गुंठे जागा दान केली.

गंगाधर पठाडे यांनी शिरूर तालुक्यात १९ सेवा केंद्रा द्वारे चाललेल्या कार्याची माहीती दिली. सतिष मोटे यांनी पुणे जिल्ह्यात १८० सेवाकेंद्रे असून त्यामध्ये आयुर्वेद विभाग, युवा प्रबोधन व शिशु संस्कार, स्वयंरोजगार विभागात ८०% समाजसेवा व २० % अध्यात्म असे विनामुल्य काम चालत असल्याची माहिती दिली.

पूनम महाजन यांचे स्वागत गितानंतर प.पू. चंद्रकांत दादा मोरे, आमदार अशोक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, माजी सभापती मोनिका हरगुडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव व मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी माजी सभापती सुजाता पवार, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे, माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, सरपंच संगीता नवनाथ हरगुडे,उपसरपंच दतात्रय हरगुडे, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर,माजी संचालक दतात्रय हरगुडे, गोरक्ष भुजबळ, माजी ग्राम पंचायत सदस्य सुनीता दरेकर, निलेश दरेकर,संजय भुजबळ, अशोक दिगवे, गोरख दरेकर, आदिनाथ हरगुडे, सुरेश हरगुडे, नामदेव दरेकर, पत्रकार मिडगुले आदींचा सत्कार चंद्रकांत दादा मोरे व आमदार अशोक पवार यांचे हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री विसपुते तर आभार माजी सभापती मोनिका हरगुडे यांनी मानले. पसायदान व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!