Thursday, June 20, 2024
Homeताज्या बातम्यामुलांच्या जडणघडणीत मातांची जबाबदारी महत्वाची  -राज्य कर उपायुक्त गितांजली टेमगिरे 

मुलांच्या जडणघडणीत मातांची जबाबदारी महत्वाची  -राज्य कर उपायुक्त गितांजली टेमगिरे 

आदर्श माता पुरस्काराने श्रीम.शांताबाई शामराव मांढरे पाटील यांच्यासह १० मातांचा सन्मान, पदवीधर संघटनेमार्फत आदर्श माता,आदर्श शिक्षक, आदर्श शाळा यांचा गौरव

शिक्रापूर – काळ बदलला तरी मुलांच्या जडणघडणीत मातांची भूमिका महत्त्वाची असून अशा कर्तृत्ववान मातांचा गौरव होणे, ही काळाची गरज आहे असे  प्रतिपादन राज्याच्या करउपायुक्त गितांजली टेमगिरे यांनी केले. 

निमित्त होते महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या शिरुर तालुका शाखेमार्फत आयोजित  स्व.धर्मराज कर्पे गुरुजी स्मृती शिक्षकरत्न पुरस्कार – २०२४ व जागतिक महिला दिनानिमित्त आदिशक्ती सन्मान सोहळ्या अंतर्गत आदर्श माता पुरस्कार वितरणाचे. शिक्षक भवन तळेगांव ढमढेरे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात  ११ माता,३७ शिक्षक, २ आदर्श शाळा यांना सन्मानित करताना शिक्षकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.पुणे महानगरपालिका सहायक आयुक्त अस्मिता धुमाळ,जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे पाटील यावेळी उपस्थित होत्या.   

 आज आम्ही अधिकारी असलो तरी शिक्षक म्हणून काम केल्याचा आजही अभिमान वाटत असून आदर्श शिक्षकाची मूल्ये जपून ठेवली आहेत, असे प्रतिपादन अस्मिता धुमाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे विभागीय अध्यक्ष सोपान धुमाळ होते.यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे यांनी संघटनेचे कार्य , राबवित असलेले विविध उपक्रम, करपे गुरुजींच्या प्रेरणादायक आठवणी यांवर प्रकाश टाकला.जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे यांच्यासह संभाजी फराटे,शहाजी पवार,मानसिंग वाकडे,युवराज थोरात,रामदास विश्वास, शिरुर शिक्षक  पतसंस्थेचे सभापती अनिल शेळके,खेड पतसंस्थेचे सभापती अशोक सावंत, नारायण करपे, सुप्रिया नवले आणि संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

आदर्श माता पुरस्कार -१)श्रीम.शांताबाई शामराव मांढरे पाटील., पार्वती पवार, सुमन पडवळ, कलावती गोडसे, अलका नगरे, कमल अडसूळ, श्रीम. लक्ष्मीबाई नरवडे, योगिता पाचर्णे, सुनंदा कामठे, श्रीम.फुलाबाई डफळ, सविता गायकवाड.

आदर्श शिक्षक पुरस्कार -उज्ज्वला पावसे,दिपाली  रासकर, उषा  राजगुरू, दत्तात्रय वाळेकर,सरीता दंडवते,बाळासाहेब  चोरे,विजया खामकर,मोहन  शिवले, मच्छिंद्र रुके,जयश्री गुरव, प्रदीप थोरात,सुवर्णा थिटे, नंदिनी शिरसाट,दिनेश निघोजकर,माधवी सोमवंशी, सिमा सोनवणे, मनोज वाबळे,हनुमंत भिवरे,अर्चना घोलप, रोहित पोटे, सुवर्णा  धुमाळ, राजू  कर्डिले, रमेश जांभळकर, अलका पांढरकर, सुदर्शन डेंबळकर, कांचन रासकर,सारिका कदम, सोनाली खारुणे, कल्याणी उमाप, मंगल वाजे

संघटनात्मक पुरस्कार , जीवन गौरव पुरस्काराने त्र्यंबक भाकरे, आदर्श तंत्रस्नेही शिक्षक –  उमेश  जाधव, आदर्श कार्यकर्ता – विजय गोसावी, अध्यात्मिक क्षेत्र पुरस्कार -राधाकिसन जोंधळे, आदर्श पत्रकार – सतीश डोंगरे, आदर्श पदाधिकारी(संघटना) – शांताराम नेहेरे ,विशेष सन्मानकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीडीएस परीक्षेतून  क्लास वन अधिकारी म्हणून निवड झालेले अखिलेश संतोष विधाटे यांचा तर आदर्श शाळा -जि.प.प्राथ.शाळा,येवले माथा (इ.१ ते ४), जि.प.प्राथ.शाळा, कारेगाव (इ.१ते ७)यांना सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

 कार्यक्रमाचे नियोजन तालुका अध्यक्ष अशोक कर्डीले यांच्यासह मिलींद अबनावे,आप्पासो जगदाळे,विलास पुंडे, संभाजी सरड,भानुदास हंबीर,मंगेश येवले,उमेश धुमाळ,रामचंद्र नवले,गोरक काळे ,शरद दौंडकर,विजय गोडसे,महिला आघाडी अध्यक्षा सविता भोगावडे,वंदना पाचर्णे,स्वाती करपे,श्वेता करपे ,ज्योती धुमाळ,सुकन्या धुमाळ,अंजली शिंदे,मानसी थोरात,संजया मांडगे, माधुरी बावणे,अश्विनी ढमढेरे,ज्योती भुजबळ,शोभा तिकांडे, यांनी केले. सूत्रसंचालन पोपट इंगवले,अंजली कोळपकर यांनी केले. आभार ज्ञानेश पवार यांनी तर राधाकिसन जोंधळे यांच्या भैरवी गायनाने सोहळ्याची सांगता झाली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!