Friday, June 21, 2024
Homeक्राइममुखई येथील बंगल्यामध्ये ३ लाख ८२ हजार रुपयांचा दरोडा

मुखई येथील बंगल्यामध्ये ३ लाख ८२ हजार रुपयांचा दरोडा

२ लाख १० हजार रुपयांसह साडे तीन तोळे सोन्याची चोरी

कोरेगाव भीमा – दिनांक २२ डिसेंबर रोजी मुखई (ता.शिरूर) धुमाळमळा येथील एका नवीन बांधलेल्या बंगल्यामध्ये ६ जणांनी दरोडा टाकला असून महिला बेडरूम लपली असता बेडरूम दरवाजा कटावणीच्या साहाय्याने तोडत महिलेला धमकावत २ लाख १० हजार रुपयांसह साडे तीन तोळे सोन्याचे चोरी झाल्याची घटना घडली आहे याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सीमा विलास येळवंडे ( वय ३५) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादी नुसार, मुखई ( ता.शिरूर) येथील धुमाळ मळा येथील नवीन बांधलेल्या बंगल्याची रात्री अडीचच्या सुमारास लाईट तोडत कटावणीच्या साहाय्याने मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडत बेडरूममध्ये लपुन बसलेल्या महिलेच्या खोलीचाही कडी कोयंडा तोडुन बेडरूम कटावणीचा धाक दाखवुन मारण्याची धमकी देत कपाटातील ड्रावरमधील २ लाख १० हजारांची रोकड व सव्वा तोळयाची सोन्याची चैन,दिड तोळ्याचे कानातील सोन्याचे झुमके, सात ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र व एक मोबाईल अशी एकूण ३ लाख ८२ हजारांची चोरी झाली असून सदर चोरीच्या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तातडीने भेट देत पाहणी केली आहे.

घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ञ, तांत्रिक विश्लेषक यांनी पाहणी केली असून स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे शोध पथक गुन्ह्याची उकल करत पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी करत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!