मिलिंदा पवार सातारा
सातारा – शिखर शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाला परंपरागत पद्धतीने जलाभिषेक करण्यासाठी राज्यभरातून मानाच्या कावडी शिखर शिंगणापूर कडे जात आहेत. सह्याद्री पर्वत रांगातील शिखर शिंगणापूर हा अखेरचा डोंगर येथे खळद, एकतपुर, शेवरी ,बेलसर ,सासवड, मावळ या पंचक्रोशी मधून मोठ्या संख्येने कावडी येतात.
यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांनी सहभाग नोंदवला असून पारंपारिक वाद्यांच्या गजरात कावडी नेण्यात आल्या. या कावडी (तांब्याचे दोन हंडे) त्यावर उंच झेंडा त्याला विविध रंगाचे कापड लावून सजवल्या उन्हात मुंगी घाटातून महादेवाचा धावा करीत वर येत जातात सायंकाळी दोरखंड व मानवी साखळीच्या आधारे या कावडी मुंगी घाटातून वर जातात.शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते यात्रेची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते शुभ शकुनाची कोणाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाचं लग्न लावलं जातं. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राजघराण्यातील युवराज किंवा राजा शिखर शिंगणापूर ला येतो आणि देवस्थानतर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो.