खेड – दिनांक ५ सप्टेंबर
मारूती सुझकी माय कार चाकण यांच्याकडून वराळे गावातील विद्या विकास प्रतिष्ठान संचलित लर्निग ट्री इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षकांचा गौरव करत शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
मारूती सुझकी माय कार चाकण यांच्याकडून खेड तालुका विद्या विकास प्रतिष्ठान संचलित, लर्निग ट्री इंग्लिश मिडीयम स्कूल,वराळे मध्ये शिक्षकांचा गौरव करत गुलाबाचे फुल देऊन शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
दिनांक ५ सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतिदिन. हा दिवस आपल्या भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
या शिक्षक दिनी कार्यक्रमास खेड तालुका विद्या विकास प्रतिष्ठान संचलित, लर्निग ट्री इंग्लिश मिडीयम स्कूल, वराळे चे संस्थापक शरद आनंदराव बुटे ,प्राचार्या सुनिता शरद बुटे व शिक्षक वर्ग उपस्थित होता.
यावेळेस प्राचार्या सुनिता बुटे यांनी आपण विद्यार्थ्यांना आपली मुले म्हणून ज्ञान देत समृद्ध करायला हवे ,त्यांच्या ज्ञान कक्षा रुंदावत समृद्ध करायला हवे. शाळेमध्ये शिक्षक दिन निमित्त मुला- मुलीचे रांगोळी स्पर्धाच ही आयोजन केले होते.
या शिक्षक दिनी मारुती सुझकी चाकण शोरूमचेचे शाखा व्यवस्थापक विशाल निकम, सिनियर रिलेशनशिप मॅनेजर गणेश विधाते यांच्या मार्गदर्शन खाली मारूती गाडीचा इवेन्ट ठेवला होता. यावेळी सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. मारूती सुझुकीच्या गाडी विषयी माहीती रिलेशनशिप मॅनेजर संतोष उकिर्डे, प्रदीप वाघ व सहकारी यांनी दिली.मारूती सुझुकी चाकण माय कार अरेना शाखेचे जनरल मॅनेजर दिपक साळुंके यांनी आभार व्यक्त केले आहे.