Friday, July 26, 2024
Homeइतरमायणी वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणी ईडी कडून कारवाई डॉ. एम. आर. देशमुख यांना...

मायणी वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणी ईडी कडून कारवाई डॉ. एम. आर. देशमुख यांना अटक

मिलिंदा पवार( वडूज)

सातारा – खटाव तालुक्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बेकायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांकडून वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रवेशासाठी भरमसाठ पैसे घेतल्याप्रकरणी तसेच महाविद्यालयांमध्ये खोटी यंत्रसामग्री खरेदी दाखवून मनी लॉन्ड्रिंग केल्याप्रकरणी मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन चेअरमन व संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एम. आर. देशमुख यांना शुक्रवारी पुण्यातून अमलबजावणी संचालनालयाने( ईडी) अटक केली त्यांना दिनांक 18 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.मायणी वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यमान संचालक अरुण गोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मायणी येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारे यंत्रसामग्री साठी बँकेतून संचालक मंडळाने सुमारे 15 कोटी रुपये कर्ज स्वरूपात घेतले होते सदर रकमेतून त्याची खरेदी न करता संचालक मंडळाने बोगस बिले बँकेकडे सादर केली बँकेच्या कर्जाची रक्कम न भरल्यामुळे बँकेकडून वेळोवेळी वैद्यकीय महाविद्यालयास पत्रव्यवहार सुरू झाला बँकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता तेथे कोणत्याही वस्तूची खरेदी नसल्याचे दिसून आले. ही माहिती निदर्शनास आली तेव्हा तत्पूर्वीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक मंडळ बदलण्यात आले होते संबंधित कंपन्यांनी ही आपण वैद्यकीय महाविद्यालयाला कोणतीही बिले दिली नसल्याचे सांगितले आहे त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाविषयी गैरसमज होऊ शकतो. म्हणून आपण ही तक्रार तत्कालीन संचालक मंडळावर देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे या तक्रारीवरुन खरेदी प्रक्रियेत मनी लॉन्ड्रिंग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टर एम आर देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई केली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!