Wednesday, April 24, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?मानवी बुद्धीचा योग्य वापर , सशक्त मन व संस्कारी समाजच राष्ट्र निर्मितीसाठी...

मानवी बुद्धीचा योग्य वापर , सशक्त मन व संस्कारी समाजच राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देऊ शकतो – सुनील भाई

उन्नत जीवन व ताण तणावाचे व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन जे एस पी एम एस भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागामध्ये संपन्न

वाघोली (ता.हवेली) व्यक्तिगत,सामाजिक जीवनात समस्या वाढत असून भीतीने प्रत्येकाला ग्रासलेले असून मानसिक तणावातून सुटण्यासाठी व्यसनाकडे झुकत चाललेला असून व्यसन हा उपाय दिसू लागलं असून  समाज अध्यात्मिक, नैतिक, सामाजिक व इतर मूल्यांचे अधःपतन होऊ न देता चांगले संस्कार रुजवून संस्कार व मनाचे मिलन करून आपण एक सशक्त भारत घडवू शकतो. कारण आपल्या बुद्धीचा योग्य तो वापर करून  एक सशक्त मन व संस्कारी समाजच राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देऊ शकतो असे प्रतिपादन सुनील भाई यांनी वाघोली येथील जे. एस. पि. एम.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयोजित कार्यक्रमामध्ये केले.

  उन्नत जीवन व ताण तणावाचे व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन जे एस पी एम एस भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागामध्ये २०२३- २४ सेमिस्टर दोन एक्सटेंशन अँड आऊट रिच ऍक्टिव्हिटी मध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्यावतीने सुनील भाई व भाग्यश्री दीदी यांनी संगणक विभागातील ७० विद्यार्थी व ९३ विद्यार्थिनींना जीवनमूल्य व आयुष्यात येणाऱ्या ताण-तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.

 यापुढे बोलताना सुनील भाई यांनी सध्या सर्वत्र व्यक्तिगत, कौटुंबिक  व सामाजिक जीवन अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. अविश्वास आणि भितीचे ढग सर्वत्र दाटलेले आहेत. नवनवीन आव्हानांना व आजारांना  सामोरे जावे लागल्याने  माणसांमधील  मानसिक ताण तणाव वाढत चालला आहे.यातून आपली  सुटका करण्यासाठी नशायुक्त पदार्थ आणि हानिकारक व्यसनांचा जीवनात उपाय म्हणून वापर करत आहे.परंतु या सर्वांचे मुख्य कारण आहे ते म्हणजे आध्यात्मिक, नैतिक, मानवीय, सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय मूल्यांचे पतन.या सर्व मूल्यांचे जतन करून आपल्या जीवनात आपले चांगले संस्कार रुजवून संस्कार व मनाचे मिलन करून आपण एक सशक्त भारत घडवू शकतो. कारण आपल्या बुद्धीचा योग्य तो वापर करून  एक सशक्त मन व संस्कारी समाजच राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देऊ शकतो असे मत व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रभावी व जीवन दृष्टिकोन बदलणारे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. माधुरी आर्या यांनी तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत वाघोली संकुलाचे संचालक प्राध्यापक सचिन आदमाने सर ,संगणक विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. गायत्री भंडारी व कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर टी के नागराज सर यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन संगणक विभागातील प्रा. नितीन शिवले, प्रा. विजय सोनवणे, प्रा.श्रीशैल पाटील, प्रा. पूजा अडसूळ यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. जुही आगरवाल व प्रा. राजश्री राठोड यांनी केले.

जे एस पी एम एस भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना जीवनाचा मूलमंत्र देत आयुष्याचा दृष्टिकोन बदलणारा अभिनव व दूरदृष्टी कोणाचा जीवनमूल्य व आयुष्यात येणाऱ्या ताण-तणावाचे व्यवस्थापन करणारा अनमोल कार्यक्रम साजरा केल्याने ७० विद्यार्थी व ९३ विद्यार्थींना मोठा लाभ झाला असून याबाबत अनेकांनी उत्स्फूर्त व अनंदायक प्रतिक्रिया देत आयोजकांचे व व्यवस्थापक,व्यवस्थापन व शिक्षक यांचे मनापासून आभार मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!