कोरोनाने आणि आरोग्य व डॉक्टर यांची उपयुक्तता सिद्ध करून दाखवली – चेतना सिन्हा
मिलिंदा पवार वडूज सातारा
वडूज – माण ( सातारा) देशी फाउंडेशन च्या कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांनी जोपासलेले समाजकार्य रुपी बांधिलकीचे रोपटे आता वटवृक्ष बनले असून कोरोना महामारीच्या काळात मान देशी फाउंडेशनने केलेले सामाजिक कार्य आदर्श ठरेल असे मत पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांनी लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस व्यक्त केले.मान देशी फाउंडेशन च्या वतीने अद्ययावत सुविधा असलेली कार्डियाक रुग्णवाहिकेत लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यावेळी माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा नगराध्यक्षा मनीषा काळे, नगरसेवक अभय , ओंकार चव्हाण , रोशना गोडसे, राधिका , शोभा वायदंडे, प्रयास चे अध्यक्ष डॉ.कुंडलिक मांडवे इत्यादी उपस्थित होते .
यावेळी चेतना सिन्हा यांनी दुष्काळी भागातील रुग्णांची उपचारासाठी होत असलेली आर्थिक अडचण लक्षात घेऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी मान देशी फाउंडेशन कार्यरत आहे कोरोनाने आरोग्य व डॉक्टरांची उपयुक्तता सिद्ध करून दाखवली आहे. माणदेशी फाउंडेशन च्या वतीने कार्डियाक रुग्णवाहिका फक्त इंधन खर्चात रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली आहे.रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून ही रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे.रेखा कुलकर्णी यांनी या सोहळ्याच्या वेळेस प्रस्ताविक केले, माया इंगळे यांनी सूत्रसंचालन केले ,शाखाप्रमुख स्मिता टकले यांनी आभार मानले.सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांचे पुस्तक व शाल भेट देऊन आधार फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक अभय देशमुख, तुषार सानप, मनोज राऊत, तानाजी वायदंडे यांनी चेतना सेना यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या .