धनंजय एज्युकेशन फाऊंडेशन मार्फत वडूज येथे माझी शाळा सुरुवात पोदार लर्न स्कूलमध्ये सुरू झाली आहे. उच्च दर्जाच्या शालेय शिक्षणासाठी शहराकडे जाण्याची गरज आता राहिली नाही. माण व खटाव तालुक्यातील जनतेला वडूज या जनतेला वडूज या मध्यवर्ती ठिकाणी पोदार स्कूलचा शुभारंभ करण्यात आला. वडूज येथे शाळेची भव्य इमारत दहिवडी वडूज रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिराशेजारी ही शाळा सुरू झाली आहे. धनंजय जगताप जगताप यांनी प्लॉटिंग क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे.
आता शैक्षणिक क्षेत्रात ही त्यांनी दमदार पाऊल टाकले आहे., सी. बी. एस. ई. पॅटर्न प्रमाणे दर्जेदार शिक्षण व. मुलांच्या वयाप्रमाणे बुद्धिमत्ता वाढवणारा अभ्यासक्रम आहे. मुलांच्या बौद्धिक वाढीबरोबरच शारीरिक क्षमता वाढीवर तसेच सांस्कृतिक वाढीला ही महत्व दिले जाणार आहे. तसेच संगीत क्षेत्रात मुलांचे कौशल्य वाढावे यासाठी गायन, तबला, पेटी यासह अनेक वाद्ये वाजवण्याचे शिक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहे. शाळेची प्रशस्त इमारत व खेळाचे मोठे मैदान हे मुख्य आकर्षण आहे. तसेच संगणक शिक्षण, डिजिटल क्लासरूम, योगासने, नृत्य याबरोबरच व्यक्तिमत्व विकास यावर भर दिला जाणार आहे. दि. २७ फेब्रुवारीपासूनचशाळेचे प्रवेश सुरू झाले आहेत. तर दि. १ एप्रिल पासून बालवाडी ते सहावीपर्यंतची शाळा सुरू होणार असल्याची माहिती अध्यक्षा ॲड माधुरी प्रभुणे यांनी दिली.