Thursday, June 20, 2024
Homeइतरमाजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासाठी ३ कोटींचा...

माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासाठी ३ कोटींचा निधी

प्रतिनिधी हेमंत पाटील सातारा

कराड -दिनांक ६ मार्च

कराड : कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहर व शहराच्या लगत वाढीव वस्तीतील रस्ते व इतर विकासकामांकरिता ३ कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. कोरोनामुळे नगरपरिषदेच्या महसुलात घट झाल्याने विशेष बाब म्हणून आ. चव्हाण यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना वस्तुस्तिथी मांडली यामुळे एकनाथ शिंदे यांनी आमदार चव्हाण यांनी मागणी केलेल्या पूर्ण निधीला मंजुरी दिलेली आहे.

या ३ कोटी रुपयांच्या निधीमधून वाढीव भागातील शिक्षक कॉलनी ते माने वस्तीपर्यंत नवीन रस्तासाठी ४० लाख रुपये, स्टेडियम ते सुर्यवंशी मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागुन सर्व्हे नं. ९८ते वाखाण रस्त्याकडे जाणारा सर्व्हे नं. ६६ पर्यंतचा नगरपरिषद भुसंपादीत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ४० लाख रु., स्टेडियम ते सुर्यवंशी मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागुन बारा डबऱ्याकडे व तेथुन पुढे पोस्टल कॉलनी पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी रु. ४० लाख, वाढीव भागातील शिंदे चौक ते कदम वस्तीपर्यंत नवीन रस्ता करणेसाठी रु. १५लाख, वाढीव भागातील कदम वस्ती ते बागवान वस्तीपर्यंत नवीन रस्ता करणेसाठी रु. २० लाख, वाढीव भागातील जानाई देवी ते शामराव पवार वस्तीपर्यंत नवीन रस्ता करणेसाठी रु. २० लाख, कराड नगरपरिषद हद्दीतील वारुंजी येथील जॅकवेल ॲप्रोज ब्रिजसाठी संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे व गॅबियन वॉल बांधणेसाठी रु. ६० लाख, शनिवार पेठ कोयनेश्वर घाट या ठिकाणी सुशोभिकरण करणेसाठी रु. १० लाख, शुक्रवार पेठ महादेव मंदिर परिसर या ठिकाणी सुशोभिकरण करणेसाठी रु. १० लाख, शनिवार पेठ वाढीव भागामधील आशा किरण महिला वस्तीगृह ते कार्वेनाका पाण्याची टाकीपर्यंत पूर्व बाजूस गटर लाईन करणेसाठी रु. २० लाख, नगरपरिषदेचे वाढीव भागातील बारा डबरे परिसरातील घनकचरा व्यवस्थापनेच्या जागेवर तांबडी माती टाकणे व सुशोभिकरणे करणेसाठी रु. ५लाख, मुजावर कॉलनी निजामभाई कागदी घरापासून मशिदीसमोरील रस्ता गटर व काँक्रीटीकरण करणेसाठी रु. १० लाख, एकविरा कॉलनी येथील राम कोळी घरापासून अली यमातनल यांचे घरापर्यंत गटर व काँक्रीटीकरण करणेसाठी रु. १० लाख असा सर्व निधी शहराच्या विकासासाठी वापरला जाणार आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!