हेमंत पाटील कराड
कराड – दिनांक ११ ऑक्टोंबर
महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार मा बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने सातारा जिल्हा नियोजन समिती सन २०२१-२२ च्या माध्यमातुन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान ( जिल्हास्तर ) या योजनेतुन कराड नगरपरिषद जुना प्रभाग नं १२ नवीन प्रभाग नं १४ मधील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
या कामांमध्ये कराड नगरपरिषद हद्दीतील पेठ शनिवार, कार्वे नाका येथील खाशाबा जाधव चौक ते मार्केट यार्ड गेट नं ५ पर्यंतच्या रस्तावर पुर्व बाजुस आर . सी . सी . गटर बांधने, कराड नगरपरिषद हदीतील पेठ शनिवार बनपुरकर कॉलनी मधील प्रजापिता ब्रम्हकुमारी इमारती पासुन फायनल प्लॉट नं .४६७ / १ पर्यंत बंदिस्त आर.सी.सी. गटर बांधने, कराड नगरपरिषद हदीतील पेठ शनिवार बनपुरकर कॉलनी मधील फायनल प्लॉट नं . ४६७ / १ चे उत्तरेस नगरपालिका गटर पर्यंत बंदिस्त आर.सी.सी. गटर करने, कराड नगरपरिषद हदीतील पेठ शनिवार मार्केट यार्ड येथील गेट नं ५ समोरील साई शॉपी ते ॲड.धुमाळ यांचे घरापर्यंतचा रस्ता कारपेट करने, आदी कामांचा समावेश आहे.
याप्रसंगी जेष्ठ माजी नगरसेवक चंद्रकांत हिंगमीरे, माजी नगरसेवक सौरभ पाटील,माजी नगरसेविका पल्लवी पवार,माजी नगरसेवक वैभव हिंगमीरे, शिवाजी पवार , सतीश भोंगाळे, राकेश शहा, राहुल खराडे, उदय हिंगमीरे, सचिन वास्के, सुरेश रैनाक,आनंदराव गायकवाड, एस एम पाटील, जब्बार पटेल, शरीफ मुल्ला, दीपक गायकवाड, रवी पाटील, भास्कर मोहिते, किरण पाटील, अनिल जोशी, महेश पवार, प्रताप भोसले,व्ही के थोरात, वाहिद मुल्ला,डॉ विजय माने,डॉ जेठमलाणी,उमेश घेवारी, धुमाळ वकील, विशाल, चव्हाण, सुहास बाबर, विनोद चव्हाण, अशोक निकम अमृत वास्के, जितेंद्र नवाळे, अभय देशमुख, अजिंक्य जाधव, दीपक चिंगळे, स्वप्निल चव्हाण, प्रकाश वास्के, सुजय मोहिते,अभय कदम, संदीप कोडगुले व स्थानिक नागरिक उपस्थित होते.