Tuesday, October 29, 2024
Homeताज्या बातम्यामाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड व...

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड व इतर गरजू कामगार महिलांना ८२०० साड्यांचे वाटप करण्यात येणार – आमदार अशोक पवार

कोरेगाव भीमा – माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड व इतर गरजू कामगार महिलांना ८२०० साड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याच्या माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली. सणसवाडी ( ता.शिरूर) येथील भैरवनाथ मंदिर सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियोजन बैठक आमदार अशोक पवार , माजी सभापती सुजाता व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पद्मविभूषण व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभा पवार या उभयतांच्या वाढदिवसानिमित्त रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना व व्यंकटेश कृपा साखर कारखाना येथील जवळपास ६००० महिला ऊसतोड कामगार व इतर गरजू महिलांना माहेरची साडी या उपक्रमांतर्गत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेबांच्या ८२व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रावलक्ष्मी फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने एकूण ८२०० साड्यांचे वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी आमदार ॲड अशोक पवार ,माजी सभापती सुजाता पवार, राष्ट्रवादीचे शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे,महिला तालुकाध्यक्ष विद्या भुजबळ, मार्केट कमिटी सभापती काकासाहेब कोरेकर, सभापती मोनिका हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, जिल्हा दूध संघाचे स्वप्नील ढमढेरे, तांबे, उपसभापती जयमाला जकाते , बाळासाहेब नरके, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, सरचिटणीस प्रकाश बाबर, शिक्रापूरचे ग्रामपंचायत सदस्य गौरव करंजे ,चेअरमन सुहास दरेकर,कैलास दरेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, सुभाष दरेकर, निलेश दरेकर, प्रशांत दरेकर, शिवाजी दरेकर, काका चव्हाण, सुखदेव दरेकर ,शाम दरेकर, नारायण फडतरे,आप्पा वडघुले ,साहेबराव भंडारे ,दादा वाखारे,अशोक करडे,प्रकाश जाधव, प्रा. अनिल गोटे मान्यवर उपस्थित होते.

मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते अष्टपैलू महिला पुरस्काराने माजी सभापती सुजाता पवार यांचा सत्कार करण्यात आला. सुजाता पवार यांनी महापूर,कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार मिळाल्याने व मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या सुजाता पवार यांचा सत्कार सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने करणार आला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!