Saturday, May 25, 2024
Homeराजकारणमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आमदार अशोक पवार यांच्यासह कारखान्याच्या निवडणुकीतील विजयी...

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आमदार अशोक पवार यांच्यासह कारखान्याच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे अभिनंदन

कोरेगाव भीमा – दिनांक १२ नोव्हेंबर

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २०/०१ असे घवघवीत यश मिळवल्यानंतर आमदार अशोक पवार, माजी सभापती सुजाता पवार, नवनिर्वाचित संचालक ऋषीराज पवार यांच्यासह नवनियुक्त संचालक मंडळ तसेच शिरूर तालुक्यातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी काल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांची भेट घेतली.
माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांच्यासह सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे,राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर – आंबेगाव तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर,शिरूर तालुका अध्यक्ष रवींद्र काळे , खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे,
पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, माजी सभापती प्रकाश पवार ,शंकर जांभुळकर जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक शिरूर तालुका अध्यक्ष सागर निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिलाध्यक्षा शिरूर विद्या भुजबळ, आरती भुजबळ, व इतर मान्यवर उपस्थित होते.

आमदार अशोक पवार यांच्या सर्व सामाजिक, राजकीय यशामध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या सुजाता पवार यांचे अचूक नियोजन व प्रभाशाली जनसंपर्क तसेच सामाजिक जाण याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!