सामान्य कार्यकर्त्यांची कदर करणारे नेतृत्व म्हणजे अजित पवार – प्रकाश बाबर
कोरेगाव भीमा – तुळपुर फाटा ( ता.हवेली) येथे एका कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरूर तालुका सरचिटणीस प्रकाश बाबर यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी व स्फूर्तिदायक असते आपल्या कामातील शिस्त, परखड ,कडक स्वभाव , जे काम होणार ते तात्काळ मार्गी लावणारे अजित पवार महाराष्ट्राला परिचित आहेत पण हेच अजित पवार सामन्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी अगदी प्रेमाने व आपुलकीने वागत त्याचा उत्साह वाढवतात व त्यांना अचूक मार्गदर्शन करतात.
तुळापूर फाटा ( ता.हवेली) येथे कार्यक्रमानिमित्त आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरूर तालुका सरचिटणीस प्रकाश बाबर यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी आमदार अशोक पवार , पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप वसंत कंद, कोरेगाव भीमा सोसायटीचे चेअरमन बबुशा ढेरंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी – माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आजित पवार यांची काम करण्याची पद्धत,सर्व सामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम करत असून यामुळे सर्व घटकांना समान न्याय मिळतो व सामान्य कार्यकर्त्यांची कदर करणारे नेतृत्व म्हणजे अजित पवार – प्रकाश बाबर, सरचिटणीस शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी