Friday, June 21, 2024
Homeक्राइम मागील खर्चाचा हिशोब मागितला म्हणून... सरपंच आणि उपसरपंचाच्या मारहाणीत ग्राम पंचायत सदस्याचा...

 मागील खर्चाचा हिशोब मागितला म्हणून… सरपंच आणि उपसरपंचाच्या मारहाणीत ग्राम पंचायत सदस्याचा मृत्यू…

जामखेड (अहमदनगर): घोडेगाव (ता. जामखेड) येथील ग्रामपंचायतीमध्ये मागील खर्चाचा हिशोब मागतो म्हणून ग्रामपंचायती मध्ये झालेल्या वादावरून शिवीगाळ करत ‘आमच्या नादी लागला तर सोडणार नाही’ असे म्हणत गंचाडी पकडून सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली. यामुळे मेंदू मध्ये रक्तस्राव झाला व उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी फिर्याद खर्डा पोलीसात दाखल करण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

फिर्यादी रेखा रावसाहेब रावण (वय ५२ रा. घोडेगाव) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा गणेश रावसाहेब रावण (वय ३२) हा ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला होता. तो व शरद जगताप एकाच प्रभागातून निवडून आले होते. यानंतर सरपंच पदासाठी गणेशने शरद जगताप यास मतदान केले होते. वर्षानंतर गणेशला सरपंच करायचे ठरले होते. पण एक वर्ष झाले तरी सरपंच शरद जगताप याने राजीनामा दिला नाही. यामुळे गणेश रावण व सरपंच शरद जगताप यांच्यात सतत भांडणे होत होती.

३० जून २०२३ रोजी गणेश हा सकाळी १० वाजता ग्रामपंचायत मध्ये मिटींग साठी गेला होता. दुपारी तो घरासमोरील वाळूच्या ढिगाऱ्यावर झोपलेला दिसला त्याने जेवनही केले नव्हते याचे कारण विचारले तर त्यांने डोके दुखत असल्याचे सांगितले. डोके दुखण्याचे कारण विचारले तर त्यांने सांगितले की, ‘ग्रामपंचायत मध्ये सरपंच शरद जगताप, उपसरपंच शमशाद शौकत मुलानी ग्रामसेवक रामदास गोरे हजर होते. यावेळी मागील खर्चाचा हिशोब मागितल्यावरून सरपंच व माझी वादावादी झाली. मी घरी येत असताना घोडेगाव खुरदैठण रस्त्यावरील पुलाजवळ सरपंच शरद जगताप व शौकत सैदु मुलानी आले व मोटारसायकल आडवी लावून तु हिशोब मागतो काय म्हणत शिवीगाळ करत आमच्या नादी लागला तर तुला सोडणार नाही म्हणून शौकत मुलानी यांने गंचाडी पकडून हाताने कानाखाली मारहाण केली. यावेळी शरद जगताप याने हाताने पाठीमागून डोक्यावर मारहाण केली. यावेळी जालिंदर कल्याण भोंडवे हे जवळून जात असताना त्यांनी आमचे भांडण सोडवले मला झालेल्या मारहाणीमुळे माझे डोके दुखत आहे.’

.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!