Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रचास कमान डाव्या कालव्याला मांजरेवाडी येथे पडले भगदाड

चास कमान डाव्या कालव्याला मांजरेवाडी येथे पडले भगदाड

माजी सभापती सुजाता पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांची तातडीने भेट

मांजरे वाडी येथील चास कमान कॉनोलला भगदाड पडताना

कोरेगाव भीमा – वाजेवाडी येथील मांजरेवाडी ( ता.शिरूर) चास कमान डाव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असताना अचानक कालव्याला भगदाड पडल्याने कॅनॉल रस्ता वाहून गेला सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले शिक्रापूर चाकण महामार्गा लागत पाणी आले होते .याबाबत स्थानिकांनी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांच्याशी संपर्क साधला याबाबत पंडित दरेकर यांनी तातडीने आमदार ॲड अशोक पवार यांना माहिती दिली असता आमदार पवार यांनी चास कमान कॅनोलचे अधिकारी कार्यकारी अभियंता चोपडे यांच्याशी संपर्क साधत फुटलेल्या कॅनॉल बाबत सूचना केली व काळजी घेण्यास सांगितले. यावर चोपडे यांनी पाण्याचा विसर्ग कमी करत कॅनॉलचे पाणी इतर ठिकाणी वळवले त्यामुळे पुढील मोठ्या प्रमाणात अनर्थ टाळला. कॅनॉल मधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने सदर पाणी चाकण शिक्रापूर महामार्गालगत येऊन पोचले काही प्रमाणात शेतीचेही नुकसान झाले असून याबाबत जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी भर पावसात चिखल गाळ तुडवत घटना स्थळी तातडीने भेट देत पाहणी केली व आवश्यक त्या सूचना करत रात्रीच्या वेळी कॅनोलच्या बाजूने कोणत्याही प्रकारचे वाहन जाणार नाही व कसलाही अपघात होणार नाही याची दक्षता राखत काळजी घेण्याचे सुचवले कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी तेथे स्थानिक नागरिक काळजी घेत आहेत .

यावेळी तातडीने कॅनॉल दुरुस्ती साठी आवश्यक सर्व साहित्य आणण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे अधिकारी यांनी दिली. कॅनॉल अधिकारी व पाटकरी साहेबराव सावंत घटनास्थळी बारकाईने लक्ष ठेऊन असून कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून लक्ष ठेऊन आहेत.

घोडगंगा साखर कारखान्याची प्रचाराच्या घोंगडी बैठका व कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी सुजाता पवार यांना कॅनोल घटनेबाबत कळले असता तातडीने बैठक ,सभा व पुढील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत भर पावसात तातडीने दाखल होत नागरिकांना आधार देत आम्ही तुमच्या सोबत आहोत काही काळजी करू नका आम्ही आहोत ना. शेतकऱ्यांना कसलीही काळजी करू नका,कोणाच्याही जीविताला धक्का लागणार नाही असा मायेचा आधार देत सुजाता पवार यांनी शेतकरी व नागरिकांना आधार दिल्याने नागरिक भारावून गेले आहेत व आमदार अशोक पवार व सुजाता पवार हे खरे सामाजिक बांधिलकी व माणुसकी जपणारी लोकाभिमुख नेतृत्व असल्याचे नागरिकांनी सांगितले.

यावेळी माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, सभापती मोनिका हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, खरेदी विक्री संचालिका सुजाता नरवडे, चेअरमन सचिन पवार, माजी सरपंच आबा वाजे, सरपंच मोहन वाजे, माजी चेअरमन सुहास दरेकर, सामजिक कार्यकर्ते सुखदेव दरेकर , निलेश दरेकर, बापू मांजरे ,अण्णा मांजरे , सदाशिव मांजरे, भिवराव मांजरे उपस्थित होते.

स्वर्गीय रावसाहेब पवार यांचा जणसेवेचा वसा आणि वारसा घेऊन जात आहोत. शिरूर हवेली तालुकाहे आमचे कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रत्येक घटक सुखी समाधानी रहावा म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. नागरिकांच्या संकटाच्या काळात त्यांच्या सोबत असणे म्हणजे त्यांची सेवा करण्याची व त्यांना आधार देण्याची अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे.माणुसकी व सेवाभाव महत्वाचा आहे .

-माजी सभापती सुजाता पवार, जिल्हा परिषद सदस्या

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!