मांजरी बुद्रुक प्रतिनिधी
मांजरी बुद्रुक – अटल इंनोवेशन मिशन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून निती आयोगाने कॅपजेमिनी व एस. आर .एस. फाउंडेशन यांच्या सहयोगाने पुण्यातील दत्तक घेतलेल्या २० शाळांसाठी २७जून २०२२ते ३० जून २०२२ असे चार दिवस UNBOX टिंकरिंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. प्रशिक्षण कार्यक्रम कृष्णाजी खंडुजी घुले विद्यालय, मांजरी बु. पुणे महाराष्ट्र या शाळेत संपन्न झाला.
या प्रशिक्षणात एटीएल डॅशबोर्ड, मेंटर ऑफ चेंज, डिझाईन थिंकींग, कंपुटेशन थिंकींग, अल्ट्रासोनिक सेंसर, ब्लूटूथ मॉडेल, चा उपयोग करून स्वतःचा कम्प्युटर बनवणे, पी एफ एम एस वर सत्र, जीई एम, 3d प्रिंटींग असे विविध मोड्यूल्स घेण्यात आले. अटल टिंकरिंग लॅब चे निदेशक दिपाली उपाध्याय, निती आयोगाचे प्रतिक देशमुख आणि कॅपजेमिनी इंडियाचे धनश्री यांनी प्रशिक्षणास उपस्थिती लावून प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.
या जागतिक समस्यांसाठी रचनात्मकता आणि नवीन विचार याला चालना देण्यासाठी शाळा, विद्यार्थी यांना ज्ञानाचा लाभ देतील. पुढील वर्षभर एआयएम यांच्या कृती कार्यक्रमाचा अवलंब करतील. एस. आर .एफ. फाउंडेशन यांच्यावतीने मनीषा दहिया आणि प्रितेश मेहेर यांनी प्रशिक्षणाचे नियोजन केले. प्राचार्य श्री. एस. एस .पाटील यांनी सहभागी शिक्षकांचे अभिनंदन केले आणि त्यांना प्रमाणपत्र वितरित केले .