राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नवरंग कला व क्रीडा संस्थाचे संस्थापक रवींद्र गोगावले, जिल्हा परिषद सदस्या कविता गोगावले यांचा स्तुत्य उपक्रम
हवेली प्रतिनिधी – सुनील थोरात
मांजरी बुद्रुक- दिनांक ७ फेब्रुवारी मांजरी बुद्रुक ( ता.हवेली) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नवरंग कला व क्रीडा संस्थाचे संस्थापक रवींद्र गोगावले, जिल्हा परिषद सदस्या कविता गोगावले व विराज गोगावले यांनी आयोजित केलेल्या मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वाटप कार्यक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरेश घुले यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने सुरेश घुले व रवींद्र गोगावले यांनी मांजरी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सुनील नारायण घुले, सचिन टकले, सागर नारायण बत्ताले, सागर भापकर, गद्रे आबा, संस्थेचे पदाधिकारी आकाश थोरात, निलेश कामथे, मनोज भंडारी, अनिरुद्ध थोरात, मनोज नाळे, प्रतीक कुदळे, स्वप्निल जाधव, श्रीनाथ वाकळे, प्रथमेश काटकर, सिद्धार्थ गुंडाले, विशाल बाबर, प्रथमेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.