प्रतिनिधी सुनील थोरात हवेली
मांजरी बुद्रुक – मांजरी बुद्रुक : ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त बाईक रॅलीच्या संयोजीका सीमा शेंडे यांनी मांजरी ग्रीन येथुन शेवाळेवाडी मार्ग मांजरी बुद्रुक गावातून बाईक रॅली काढली यावेळी सीमा शेंडे यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी महिलांची बाईक रॅली काढली असुन २१ व्या शतकाच्या वाटचालीवर असताना आगदी महिला अंतराळवी, डॅक्टर, वकील, समाजसेविका, राजकारणात पारंगत झाल्या असल्या तरी समाजात अजूनही महिलांवरील अन्याय अत्याचार कमी झाले नाहीत. समाजात जनजागृती करण्यासाठी या महिला दिनी बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.
या बाईक रॅलीच्या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना कोद्रे, ओबीसी पुणे शहराच्या भाजपा उपाध्यक्ष स्मिता गायकवाड, उपाध्यक्ष नीना ओसवाल, सरचिटणीस छाया गदादे, उपाध्यक्ष गायत्री घुले आणि मांजरी शेवाळेवाडी परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या.