Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्यामहिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रकाश बाबर यांना राखी बांधत...

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रकाश बाबर यांना राखी बांधत कुटुंबीयांशी साधला संवाद

पुणे – भावा बहिणीच्या नात्यातील अत्यंत महत्वाचा, पावित्र्याचा आणि आनंदाचा सण म्हणजे रक्षाबंधन असून यानिमित्त सर्वसामान्य कुटुंबातील व वाडा पुनर्वसन येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर सरचिटणीस प्रकाश बाबर यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राखी बांधल्याने प्रकाश बाबर व कुटुंबीयांनी अत्यंत आनंद व्यक्त केला आहे.

रक्षाबंधन सणानिमित्त राष्ट्रवादी काँगेसचे शिरूर तालुका सरचिटणीस प्रकाश बाबर व कुटुंबीय रुपाली चाकणकर यांच्या घरी भावा बहिणीच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा असणारा क्षण साजरा करण्यात आला.

यावेळी महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रकाश बाबर यांचे औक्षण केले तसेच सर्व कुटुंबीयांसोबत बराच वेळ ( अर्धा तास) संवाद साधल्याने कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला असून ही भेट आयुष्यातील अविस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया प्रकाश बाबर व कुटुंबीयांनी व्यक्त केली.

रुपाली चाकणकर यांनी प्रकाश बाबर यांच्या पत्नी मंगल प्रकाश बाबर साडी देत पाहुणचार केला तर , मुलगा अवधूत व मुलगी वैभवी यांच्याशी संवाद साधला मुलांना खाऊ व कॅटबरी देत शिक्षण व भविष्यातील स्वप्ने जाणून घेत मार्गदर्शन केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!