Monday, October 14, 2024
Homeन्यायमहिलामहिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मोलाची कामगिरी - रामदास दाभाडे

महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मोलाची कामगिरी – रामदास दाभाडे

कोरेगाव भीमा – वाघोली ( ता.हवेली) आधुनिक काळात महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मोलाची कामगिरी रामदास भाऊ दाभाडे प्रतिष्ठान व तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली असून अनेक महीला भगिनींना याचा लाभ झाला आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त रामभाऊ दाभाडे प्रतिष्ठान व तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे बोलत होते.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांनी, हा उपक्रम हा दरवर्षी तेजस्विनी ट्रेनिंग सेंटर मध्ये रामदास भाऊ दाभाडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन महिन्यांच्या कालावधीसाठी वाघोली प्रभागात राबवला जातो. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यावेळी संस्थेमध्ये १५० महिलांनी प्रवेश घेतला असून जास्तीत जास्त महिलांनी प्रशिक्षणामध्ये भाग घ्यावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस्विनी सामाजिक संस्थेचे सचिव संजय तांबोळकर यांनी केले. यावेळी वाघोलीचे माजी उपसरपंच कैलास सातव, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कटके, राम भाडळे, लक्ष्मण भाडळे, संदेश कटके, प्रतीक तांबे, सोन्या तांबे, राकेश जावळे व महिला भगिनी उपस्थित होते.

संस्थेमध्ये चालू असणाऱ्या मोफत कोर्सेस जसे बेसिक टेलरिंग क्लास , बेसिक ब्युटी पार्लर, बेसिक कॉम्पुटर कोर्स, बेसिक मेकअप, मसाला मेकिंग, डान्स क्लास, चित्रकला क्लास ( लहान मुलांसाठी) तसेच फ्री हेल्थ चेकअप व मोफत ई- श्रम कार्ड काढून मिळणार आहे .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!