Monday, June 17, 2024
Homeइतरमहाशिवरात्री निमित्त पांडवकालीन श्री क्षेत्र नरेश्र्वर महाराज येथे हजारो भाविक भक्तांची गर्दी

महाशिवरात्री निमित्त पांडवकालीन श्री क्षेत्र नरेश्र्वर महाराज येथे हजारो भाविक भक्तांची गर्दी

भव्य बैलगाडा शर्यतीसह ,पाळणे यांच्यासह हजारो भाविकांची गर्दी

कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नरेश्वर महाराजांची महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.प्रसिद्ध पांडवकालीन श्री नरेश्र्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत, पाळणे यांच्यासह मंडप व्यवस्था व भाविकांच्या सोयीसुविधा करण्यात आली होती. यावेळी आमदार अशोक पवार यांनी यात्रा उत्सवास भेट देत नरेश्वर महाराजांचे दर्शन घेतले.

यावेळी नरेश्र्वर मंदिर परिसरात गाडा भाविक भक्त, नागरिक ,गाडा मालक व शौकिनांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. घाट दुतर्फा गर्दीने फुलून गेला होता तर निवेदकांनी यात्रेत जोरदार आवाजाने रंगत भरली यावेळी माजी चेअसरमन नामदेव दरेकर यांची ११.६२ सेकंदामध्ये बारी बसल्याने प्रथम घाटाचा राजा मान मिळवला तसेच यावेळी उपस्थित बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे यांनी पाच हजार एक असे बक्षीस देत अभिनंदन केले यावेळी भाजपचे जयेश शिंदे उपस्थित होते.
यावेळी मंदिर परिसरात नरेश्र्वर जीर्णोद्धार समिती यांच्यावतीने उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मंदिर प्रशासनाच्यावतीने ठिकठिकाणी बॅरीगेट व दर्शनबारी रांगा करण्यात आल्या होत्या त्यामुळे शिस्तबद्ध दर्षणबारी यामुळे भाविकांना वेळेत दर्शन मिळत होते.

यावेळी सरपंच संगीता हरगुडे, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे,माजी पुणे जिल्हा नियोजन समिती पंडित दरेकर, माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, काँग्रेसचे वैभव यादव,माजी सरपंच रमेश सातपुते, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ , माजी सरपंच सुरेश हरगुडे, गोरख दरेकर माजी चेअरमन विकास हरगुडे,विष्णू हरगुडे, माजी ग्राम पंचायत सदस्य नामदेव दरेकर, कळुराम दरेकर, लक्ष्मण दरेकर अमोल हरगुडे,शरद दरेकर , आदिनाथ हरगुडे ,अमोल दरेकर,बाबुषा दरेकर ,विक्रम भुजबळ,रवींद्र दरेकर, अजय हरगुडे, बाळासाहेब शेलार, हर्षद हरगुडे, बाळासाहेब मोरे, कैलास दरेकर ,शिवाजी दरेकर उपस्थित होते.

नरेश्र्वर जीर्णोद्धार समिती यांच्यावतीने भाविकांना एव्हाना करणेता आले असून मंदिर परिसरात पाण्याची टाकी, दर्शन बारी रांग व सभामंडप ,गार्डन, मंदिर परिसरात पायऱ्या यांच्यासाठी सढळ हस्ते मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित लेख

2 COMMENTS

 1. छान रिपोर्टिंग
  आपल्याच भागातील घडत असणाऱ्या घड़ामोड़ी लोकांना माहिती नसतात
  आपन खूपच उपयुक्त माहिती बातमीद्वारे देत असता
  धन्यवाद
  Keep it up sir

 2. छान रिपोर्टिंग
  आपल्याच भागातील घडत असणाऱ्या घड़ामोड़ी लोकांना माहिती नसतात
  आपन खूपच उपयुक्त माहिती बातमीद्वारे देत असता
  धन्यवाद
  Keep it up sir

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!