Wednesday, April 24, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी दिनेश लडकत तर सरचिटणीसपदी संजय खाडे...

महाराष्ट्र विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी दिनेश लडकत तर सरचिटणीसपदी संजय खाडे यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र विद्युत मंडळ अधिकारी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४६ वे वार्षिक अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच पार पडले. यात संघटनेची नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी दिनेश लडकत यांची तर सरचिटणीसपदी संजय खाडे यांची निवड करण्यात आली.

स्वराज्य राष्ट्र
महाराष्ट्र विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी दिनेश लडकत तर सरचिटणीसपदी संजय खाडे बिनविरोध निवड

    उर्वरित कार्यकारिणी मध्ये : संघटन सचिव –  विजय गुळदगड, कार्याध्यक्ष – संजय चव्हाण, दीपक ढोले,  उपसरचिटणीस –  प्रणेश शिरसाठ, नंदकिशोर साटकर, कोषाध्यक्ष – प्रवीण गायकवाड, उपसरचिटणीस –  उमेश काळे, सुनील पावडे, अजय गुळवे. महिला प्रतिनिधी – मंजुषा दुसाने, अर्चना घोंडबरे यांचा समावेश आहे.

     याप्रसंगी सरचिटणीस संजय खाडे म्हणाले की, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती व सूत्रधारी कंपनी अंतर्गत वित्त व लेखा, मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान, औद्योगिक संबंध, जनसंपर्क, विधी, सुरक्षा व अंमलबजावणी आदी विभागातील अधिकाऱ्यांचे ही संघटना प्रतिनिधित्व करते. तिन्ही वीज कंपन्यांतील अतांत्रिक अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन कार्यकारिणी अधिक जोमाने प्रयत्न करणार आहे. यात १ एप्रिल २०२३ पासून येऊ घातलेली वेतनवाढ ३० टक्क्यांपर्यंत मिळवून देण्यासाठी संघटना सर्वतोपरी प्रयत्न करणे, अधिकाऱ्यांचे वर्क नॉर्म्स निश्चित करणे, सर्व अतांत्रिक अधिकार्‍यांच्या रखडलेल्या पदोन्नती पॅनलबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) वेतननिश्चितीमधील तफावत दूर करणे, जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अपग्रेडेशनबाबत प्रश्न निकाली काढणे, अंतर्गत भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्याबाबत उपाययोजना करणे, लेखापरीक्षण पूर्वीप्रमाणेच लेखा विभागामार्फत सुरू करणे, महावितरण कंपनीस आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनास सर्वोतोपरी मदत करणे, वीज उद्योगास खाजगीकरणापासून रोखणे आदी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये कामकाज करण्याचा मानस आहे, असे सरचिटणीस संजय खाडे यांनी सांगितले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!