Friday, July 12, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औद्योगिक सरक्षा व आरोग्य (कामगार विभाग) संचालकपदाला महेंद्र सावंत...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औद्योगिक सरक्षा व आरोग्य (कामगार विभाग) संचालकपदाला महेंद्र सावंत यांची गवसणी

सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने खडतर आव्हानांवर मत करत संपादन केले नेत्रदीपक यश

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे वास्तव्यास असलेले व उरळगावचे सुपुत्र महेंद्र शांताराम सावंत यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत उत्तोर्ण होऊन सहायक संचालक औद्योगिक सरक्षा व आरोग्य (कामगार विभाग) क्लास -2 या पदी निवड झाली.
अत्यंत खडतर आव्हानांचा सामना करत महेंद्र सावंत यांनी मिळवलेले यश हे ग्रामीण भागातील तरुणाईला प्रेरणादायी असून अथक परिश्रम व सातत्य ठेवल्यास आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करता येते याचे कृतियुक्त उदाहरण महेंद्र सावंत यांनी तरुणाई समोर ठेवले आहे.
विद्यार्थी दशेपासून समाज सेवेची आवड असलेल्या व ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी सत्व या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा क्लास घेतले तसेच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कोरेगाव भीमा येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कल येथे माध्यमिक व JSPM वाघोली येथे डिप्लोमाचे शिक्षण तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयातुन मेकॅनिकल इंजिनिअरींग पदवी संपादित करुन ओरीयंटल रबर करंदी, मास्क पाॅलीमर्स तळेगाव दाभाडे ,युपीएसपीएल तर्फे स्कोडा ऑटो व्होक्सवॅगन चाकण अशा ठिकाणी नोकरी केली.
सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने महाराष्ट्र लकसेवा आयोगाच्या औद्योगिक सरक्षा व आरोग्य (कामगार विभाग) संचालकपद – वर्ग २ वार आपले नाव कोरले असून यामुळे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणाईला प्रेरणा मिळाली आहे.

महेंद्र सावंत यांनी संपादन केलेल्या यशामुळे उरळगाव , कोरेगाव भिमा तसेच आजोळ केंदुर ग्रामस्थांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून शिरूर तालुक्यात विविध ठिकाणी त्यांचा व कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येत आहे.

आपण जे स्वप्न पाहतो ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे सातत्याने प्रयत्न करायला हवे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ठरवले ते सर्वकाही साध्य करू शकतात यासाठी गरज आहे सातत्य, धेय्यनिष्ठता, कठोर परिश्रम व निश्चित धेय्याची. – महेंद्र सावंत

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!