Friday, June 21, 2024
Homeकृषिमहाराष्ट्र राज्य बीज कॉर्पोरेशन लि. कंपनीच्या वतीने परसबाग भाजीपाला बियाणाचे शेतकरी...

महाराष्ट्र राज्य बीज कॉर्पोरेशन लि. कंपनीच्या वतीने परसबाग भाजीपाला बियाणाचे शेतकरी महिलांना वाटप

कोरेगाव भीमा – १२ जुलै सणसवाडी ( ता.शिरूर) शिरूर तालुका कृषि विभागाच्या वतीने पोषण युक्त सुरक्षित अन्न योजना अंतर्गत भाजीपाला किटचे ग्रामपंचायत कार्यालय सणसवाडी येथे सरपंच संगीता नवनाथ हरगुडे यांच्या उपस्थिती महिलांना वाटप करण्यात आले.

सदर भाजीपाला किट अंतर्गत परसबागेमध्ये करावयाच्या विविध प्रकारच्या फळभाज्या व भाजीपाला यांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. कुटुंबासाठी आवश्यक असणारा भाजीपाला याचे उत्पादन घरच्या घरी घेता यावे व विषमुक्त भाजीपाला उपलब्ध होण्याचे दृष्टिकोनातून सदरचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या कार्यक्रमात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, हुमणी नियंत्रण विविध पिकांची आधुनिक तंत्रज्ञान पद्धती याबाबतची माहिती उपस्थित सदस्यांना देण्यात आली व कृषी विभागामार्फत सद्यस्थितीत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ महाडीबीटी पोर्टल द्वारे घेण्याबाबतचे आवाहन कृषी सहायक नवज्योत आगे व ग्राम विकास अधिकारी पवणे यांचे मार्फत करण्यात आले.

यावेळी सरपंच संगीता हरगुडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, ग्रामपंचायत सदस्य शशिकला सातपुते, सुवर्णा दरेकर, रुपाली दरेकर, सोसायटी संचालक काळुराम दरेकर यासह महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!